भ्रष्टाचारप्रकरणी खैरेंवर कारवाई व्हावी, हर्षवर्धन जाधव यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:36 IST2017-08-01T04:36:39+5:302017-08-01T04:36:45+5:30

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी विकासनिधीच्या कामात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.

Harshavardhan Jadhav's demand for action against corruption | भ्रष्टाचारप्रकरणी खैरेंवर कारवाई व्हावी, हर्षवर्धन जाधव यांची मागणी

भ्रष्टाचारप्रकरणी खैरेंवर कारवाई व्हावी, हर्षवर्धन जाधव यांची मागणी

औरंगाबाद : शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी विकासनिधीच्या कामात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. यानिमित्ताने शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
खैरे यांनी कन्नड तालुक्यात खासदार निधीतून केलेल्या कामातील गैरव्यवहार, उपविभागीय अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत समोर आला आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात टाकले आहे, त्याचप्रमाणे खैरेंनादेखील तुरुंगात टाकण्यात यावे, असे आ. जाधव म्हणाले.
खा. खैरेंवर काय कारवाई करणार, याबाबत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगून, खैरेंवर कारवाई करण्याऐवजी पक्षविरोधी कृत्य केल्याबद्दल माझ्याच नावाने बिल फाडण्यात येते की काय, अशी भीतीही आ. हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केली.

Web Title: Harshavardhan Jadhav's demand for action against corruption