हरिश्चंद्र माधव बिराजदार स्मृतिदिन
By Admin | Updated: September 14, 2016 10:20 IST2016-09-14T10:20:23+5:302016-09-14T10:20:23+5:30
हरिश्चंद्र माधव बिराजदार हे पहिलवानी कुस्ती खेळणारे मराठी कुस्तीगीर व कुस्ती-प्रशिक्षक होते.

हरिश्चंद्र माधव बिराजदार स्मृतिदिन
style="text-align: justify;">प्रफुल्ल गायकवाड, ऑनलाइन लोकमत
(५ जून, इ.स. १९५० : १४ सप्टेंबर, इ.स. २०११)
हरिश्चंद्र माधव बिराजदार हे पहिलवानी कुस्ती खेळणारे मराठी कुस्तीगीर व कुस्ती-प्रशिक्षक होते. स्कॉटलंड येथे झालेल्या इ.स. १९७० सालातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते, तर इ.स. १९७२ साली त्यांनी भारतातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद जिंकून रुस्तम-ए-हिंद किताब मिळवला होता. खेळाडू म्हणून कारकिर्द संपल्यावर ते कुस्ती-प्रशिक्षक म्हणून काम करत होते. पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत ते कुस्ती शिकवत असत.
जीवन
५ जून, इ.स. १९५० रोजी महाराष्ट्राच्या वर्तमान लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात रामलिंग मुदगड या गावी हरिश्चंद्र बिराजदारांचा जन्म झाला. त्यांचे वडील पहिलवान होते. हरिश्चंद्रांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांची आई निवर्तली. वडिलांनी कुस्ती खेळण्यातले हरिश्चंद्रांच्या अंगचे गुण हेरून त्यांना इ.स. १९६५च्या सुमारास तालीम करण्यासाठी कोल्हापुरास गंगावेस तालमीत धाडले. इ.स. १९६९ मध्ये दादू चौगुले याला हरवत त्यांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्याच वर्षी कानपूर येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी हिंदकेसरी किताबही जिंकला. स्कॉटलंडातील एडिंबरा येथे झालेल्या इ.स. १९७० सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी कुस्तीतले सुवर्णपदक जिंकले. इ.स. १९७२ साली वाराणसीयेथे झालेल्या भारतातल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी नेत्रपाल नावाच्या दिल्लीच्या कुस्तीगिराला हरवत रुस्तम-ए-हिंद किताब पटकावला. इ.स. १९७७ साली बेळगाव येथे झालेल्या मैदानी कुस्तीच्या मुकाबल्यात त्यांनी दिल्लीच्या बिर्ला आखाड्याच्या सत्पाल मल्लास हरवण्याचे आव्हान जिंकले.
पुरस्कार
२००६ - मेजर ध्यानचंद पुरस्कार
१९७१ - शिवछत्रपती पुरस्कार
१९९८-९९ - दादोजी कोंडदेव पुरस्कार
२००० - राष्ट्रीय विशेष पुरस्कार
११९४ - जागतिक मराठी परिषद
कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे
१९७२ मध्ये म्यूनिच येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग
१९७० मध्ये एडमंटन, कॅनडा येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सहभाग
१९७० मध्ये एडिंवरो, स्कॉटलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले
१९७२ मध्ये वाराणसी येथे झालेल्या रुस्तम-ए-हिंद राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रूस्तम-ए-हिंद हा किताब पटकाविला
१९७७ मध्ये बेळगाव येथे झालेल्या मैदानी कुस्ती स्पर्धेत सत्पाल सिंगवर विजय मिळविला
१९७३ मध्ये मुंबईत झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले
१९६९ मध्ये हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक आणि १९६८ मध्ये हिंद केसरी स्पर्धेत रौप्यपदक
१९६९ मध्ये लातूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब