हरिभाऊ बागडे हाजीर हो!
By Admin | Updated: February 1, 2015 02:06 IST2015-02-01T02:06:13+5:302015-02-01T02:06:13+5:30
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि रत्नाकर कुलकर्णी यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हरिभाऊ बागडे हाजीर हो!
औरंगाबाद : देवगिरी प्रतिष्ठानमधील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यावर भरली नाही. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि रत्नाकर कुलकर्णी यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
हरिभाऊ किशनराव बागडे, रत्नाकर माणिकराव कुलकर्णी आणि मनोहर उत्तमराव देशपांडे यांनी देवगिरी प्रतिष्ठान कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी भरला नाही. तिघांपैकी देशपांडे यांचे निधन झाले आहे. प्रकरणी कलम ४०६, ४०९ आणि ३४ प्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होता. प्रकरण २००६ पासून न्यायालयात सुनावणीसाठी असून, आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वाय. के. मोरे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि रत्नाकर कुलकर्णी यांना ११ फेबु्रवारी २०१५ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
पाच वर्षांपेक्षा अधिक जुने प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. २७ जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयानेदेखील आमदार आणि खासदारांच्या विरोधातील प्रकरणे एक वर्षात निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.
२७ जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयानेदेखील आमदार आणि खासदारांच्या विरोधातील प्रकरणे एक वर्षात निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.