तब्बल ५ तासांनी सुरू झाली हार्बरची रेल्वे वाहतूक
By Admin | Updated: February 27, 2017 11:29 IST2017-02-27T07:02:06+5:302017-02-27T11:29:48+5:30
जीटीबी नगर घरसलेले मालगाडीचे डबे हटवण्यात अखेर यश आले असून पाच तासांनी हार्बर रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक सुरू झाली.

तब्बल ५ तासांनी सुरू झाली हार्बरची रेल्वे वाहतूक
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - जीटीबी नगर घरसलेले मालगाडीचे डबे हटवण्यात अखेर यश आले असून पाच तासांनी हार्बर रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक सुरू झाली.
सोमवारी पहाटे चारच्या सुमारास जीटीबी नगर येथे मालगाडीचे चार डबे घसरल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. हार्बर मार्गावर वडाळा-कुर्ला लाइन बंद ठेवण्यात आल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गाड्यांचा प्रॉब्लेम झाल्याने कामावर निघालेल्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला आहे. दरम्यान सीएसटी-पनवेल मेनलाईनवरून वाहतूक सुरू आहे.