तांत्रिक बिघाडामुळे हार्बरची वाहतूक विस्कळीत
By Admin | Updated: February 23, 2017 20:53 IST2017-02-23T20:45:04+5:302017-02-23T20:53:33+5:30
हार्बर मार्गावरील लोकलची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत.

तांत्रिक बिघाडामुळे हार्बरची वाहतूक विस्कळीत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - हार्बर मार्गावरील लोकलची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लोकल गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सातच्या सुमारास हार्बर मार्गावरील वडाळा स्थानकादरम्यान सीएसटीहून पनवेलकडे जाणा-या लोकलला तांत्रिक बिघाड झाला. यामुळे सुरुवातीला या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर काहीवेळाने ही वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र, या मार्गावरील लोकल गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत.
दरम्यान, ऐन गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. त
All down trains at Harbour line of MumbaI local unable to proceed beyond Wadala due to a technical glitch. (representative picture) pic.twitter.com/egBgUx3Ap4
— ANI (@ANI_news) February 23, 2017