रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत
By Admin | Updated: April 6, 2015 10:02 IST2015-04-06T10:00:09+5:302015-04-06T10:02:36+5:30
नपाडा स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्याने आठवड्याच्या पहिल्याचा दिवशी हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.

रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत
>ऑनलाइन लोकमत
मुंबी, दि. ६ - सानपाडा स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्याने आठवड्याच्या पहिल्याचा दिवशी हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. हार्बर रेल्वेमार्गावरील दोन्ही दिशेच्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत असून कामावर निघालेल्या चाकरमान्यांना माहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून रूळ दुरूस्तीचे काम सुरू आहे.
सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे आलेला 'लॉँग विकेंड' एन्जॉय करून मुंबईकर आज कामावर परतले खरे, मात्र रुळाला तडे गेल्याने लोकलसेवा खोळंबली आणि चाकरमानी अडकले. गेल्या तासाभरापासून सीएसटी व पनवेलकडे जाणा-या दोन्ही मार्गांवरील रेल्वे गाड्या उशीराने धावत असल्याने स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे.