हार्बर रेल्वे विस्कळीत, नोकरदारांचे हाल
By Admin | Updated: March 24, 2017 10:28 IST2017-03-24T10:27:01+5:302017-03-24T10:28:39+5:30
सकाळी भर गर्दीच्यावेळी हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतुक विस्कळीत झाल्याने कामावर जाणा-या नोकरदारांचे हाल सुरु आहेत.

हार्बर रेल्वे विस्कळीत, नोकरदारांचे हाल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - सकाळी भर गर्दीच्यावेळी हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतुक विस्कळीत झाल्याने कामावर जाणा-या नोकरदारांचे हाल सुरु आहेत. हार्बर मार्गावर चेंबूरजवळ क्रॉसिंग पॉईंटमध्ये सकाळी आठच्या सुमारास बिघाड झाला.
त्यामुळे वाहतूक तब्बल दीडतास ठप्प होती. बिघाड दुरुस्त झाल्यानंतरही वाहतूक पूर्वपदावर आलेली नाही. लोकल गाडया उशिराने धावत आहेत. त्यामुळे नोकरदारांचा आज लेट मार्क लागू शकतो.