सीएसटीजवळ हार्बर लोकल घसरली

By Admin | Updated: September 15, 2014 04:30 IST2014-09-15T04:30:18+5:302014-09-15T04:30:18+5:30

सीएसटी स्थानकात पनवेलहून आलेली लोकल आत शिरताच या लोकलच्या एका डब्याची दोन चाके रुळावरून घसरली आणि हार्बर रेल्वे विस्कळीत झाली

Harbor local dropped near CST | सीएसटीजवळ हार्बर लोकल घसरली

सीएसटीजवळ हार्बर लोकल घसरली

मुंबई : सीएसटी स्थानकात पनवेलहून आलेली लोकल आत शिरताच या लोकलच्या एका डब्याची दोन चाके रुळावरून घसरली आणि हार्बर रेल्वे विस्कळीत झाली. तब्बल अडीच तास हार्बर विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला.
मध्य रेल्वेवरील मेन लाइन आणि हार्बरवर रविवारी मेगाब्लॉक होता. हार्बरवर नेरूळ ते मानखुर्ददरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा ब्लॉक होता. त्यामुळे पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएसटी दरम्यानच्या लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. या दरम्यान फक्त विशेष लोकल चालवल्या जात होत्या.
मात्र सकाळी १0.५0च्या सुमारास पनवेलहून सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २वर लोकल येत असतानाच या लोकलची पनवेलच्या दिशेने असलेल्या आठव्या डब्याची दोन चाके रुळावरून घसरली. त्यामुळे मध्य रेल्वेकडून नियोजित वेळेनुसार घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्दच करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सर्व रेल्वे कर्मचारी घसरलेला डबा रुळावर आणण्याच्या कामाला लागले. ही ट्रेन सीएसटी स्थानकात शिरताच घटना घडल्याने या ट्रेनचे पाच डबे स्थानकात तर उर्वरित चार डबे स्थानकाबाहेर होते. त्यामुळे या लोकलमधील मागील डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रुळावर उतरून सीएसटी स्थानकात जावे लागले. २ नंबर प्लॅटफॉर्मवर हा प्रकार घडल्याने १ आणि २ नंबर प्लॅटफॉर्म बंद करण्यात आले आणि हार्बर सेवा ३ नंबर प्लॅटफॉर्मवरून सुरू ठेवण्यात आली.

Web Title: Harbor local dropped near CST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.