रुळाला तडे गेल्याने हार्बर विस्कळीत

By Admin | Updated: April 25, 2017 02:43 IST2017-04-25T02:43:55+5:302017-04-25T02:43:55+5:30

वाशी ते मानखुर्द दरम्यान सोमवारी सकाळी रेल्वे रुळाला तडे गेल्याने हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा एक तास विस्कळीत झाली.

Harbor disrupted after rushing to Rola | रुळाला तडे गेल्याने हार्बर विस्कळीत

रुळाला तडे गेल्याने हार्बर विस्कळीत

मुंबई : वाशी ते मानखुर्द दरम्यान सोमवारी सकाळी रेल्वे रुळाला तडे गेल्याने हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा एक तास विस्कळीत झाली. यामुळे लोकलच्या १0 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, तर ४५ लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला.
सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास वाशी ते मानखुर्द दरम्यान अप मार्गावर (सीएसटी दिशेने) रेल्वे रुळाला तडा गेला. सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा वेग मंदावल्यामुळे गाड्या एकामागे एक उभ्या होत्या. ९.३0 वाजण्याच्या दरम्यान दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. दरम्यान सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत होत्या. दुरुस्तीनंतरही सकाळी जवळपास ११ वाजेपर्यंत या मार्गावरील लोकल उशिरानेच धावत होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Harbor disrupted after rushing to Rola