हापूसला तोडीस तोड ‘कोकण सम्राट’

By Admin | Updated: August 20, 2014 02:12 IST2014-08-20T02:12:59+5:302014-08-20T02:12:59+5:30

तब्बल 16 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर हापूसला तोडीस तोड ठरू शकणारी ‘कोकण सम्राट’ ही नवी जात शोधण्यात संशोधकांना यश आले आहे.

Hapus breaks out of 'Konkan Samrat' | हापूसला तोडीस तोड ‘कोकण सम्राट’

हापूसला तोडीस तोड ‘कोकण सम्राट’

शिवाजी गोरे- दापोली
तब्बल 16 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर हापूसला तोडीस तोड ठरू शकणारी ‘कोकण सम्राट’ ही नवी जात शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधक शास्त्रज्ञ डॉ. अविनाश शिंदे, डॉ. मुराद बुरोंडकर व डॉ. भरत साळवी यांनी ही किमया साधली आहे. साकाविरहित व दरवर्षी आंबा उत्पादन देणा:या या जातीचे शेतक:यांनी स्वागत केले आहे.
हापूस आणि टॉमी अॅटकिन्स यांच्या संकरातून ही जात विकसित करण्यात आली आहे. ‘कोकण सम्राट’मध्ये फायबरचे प्रमाण कमी, चव गोड, रंग आकर्षक असल्याने हा आंबा मन मोहून टाकतो. त्याची रोग प्रतिकारकारक शक्ती चांगली असल्याने कोकणात आढळणा:या फळमाशी, करपा, बुरशी या रोगांचा परिणाम होत नाही. विद्यापीठाच्या वेंगुर्ले फळसंशोधन केंद्रात 1997 साली डॉ. शिंदे व बुरोंडकर यांनी संशोधनाला सुरुवात केली. 1998ला जात संकरित करण्यात आली. 
 
हापूसचे दोष दूर होणार
च्हापूस आंबा कलम एकवर्ष आड पीक देते. तसेच हापूसमध्ये साका धरला तर तो भाग काढून टाकावा लागतो. हे हापूसचे मुख्य दोष आहेत. ते या नव्या जातीमध्ये काढून टाकण्यावर संशोधकांचा भर होता आणि त्यालाही यश आले आहे. कोकण सम्राटच्या जातीला दरवर्षी आंबे लागतील आणि त्याला साका धरणार नाही.
च्काहीवेळा आंब्याच्या आतील बाजूला बाठय़ाजवळ पांढरट पिवळा भाग तयार होतो. त्याला साका म्हणतात. तो भाग खाण्यायोग्य नसतो. फळ उन्हात राहिला तर साका तयार होतो. ‘कोकण सम्राट’मध्ये साका तयार होणार नाही, असा दावा संशोधकांनी केला आहे.
 
‘कोकण सम्राट’ ही
नवी जात येथील शेतक:यांना वरदान
ठरू शकेल. हापूसच्या उणिवा या जातीत
भरून काढण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला
आहे. याची लागवड केल्यावर शेतक:यांना फायदा मिळेल.
- डॉ. किसन लवांदे, कुलगुरू,
डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

 

Web Title: Hapus breaks out of 'Konkan Samrat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.