मंत्र्यांची ‘लोकमत’ला शुभेच्छाभेट

By Admin | Updated: December 17, 2014 00:34 IST2014-12-17T00:34:17+5:302014-12-17T00:34:17+5:30

लोकमत नागपूर आवृत्तीच्या ४३ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्य शासनातील मंत्र्यांनी मंगळवारी लोकमत भवनाला शुभेच्छा भेट दिली. यात पर्यावरण मंत्री रामदास कदम,

Happy Ministers of the Lokmat | मंत्र्यांची ‘लोकमत’ला शुभेच्छाभेट

मंत्र्यांची ‘लोकमत’ला शुभेच्छाभेट

नागपूर : लोकमत नागपूर आवृत्तीच्या ४३ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्य शासनातील मंत्र्यांनी मंगळवारी लोकमत भवनाला शुभेच्छा भेट दिली. यात पर्यावरण मंत्री रामदास कदम, अन्न व नागरी पुरवठा-संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समावेश होता. या सर्व मंत्र्यांनी यावेळी ‘लोकमत’च्या वाटचालीविषयी प्रशंसोद्गार काढले. लोकमत वृत्तपत्र समूहाचे ‘एडिटर इन चिफ’ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी त्यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. जनतेचा विकास डोळ््यासमोर ठेवून काम करण्याचा मानस सर्वांनीच व्यक्त केला.
राज्याच्या पर्यावरण विभागाकडे काम करायला खूप संधी आहे. पर्यावरणाला हानी न होता राज्याचा विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न असेल. कोकण ते मुंबई हा समुद्री महामार्ग निर्माण करण्याचा मानस आहे. विविध प्रकल्पांचा अभ्यास सुरू असून मी तेथे जाऊन आढावा घेणार आहे.
-रामदास कदम
पर्यावरणमंत्री
सार्वजनिक वितरण प्रणालीच्या नावाखाली होणारे गैरप्रकार मोडीत काढण्याचे मोठे आव्हान राज्य शासनासमोर असून ‘बायोमॅट्रिक कार्ड’द्वारे यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न असेल. भेसळ अजिबात सहन करण्यात येणार नाही व नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करु.
-गिरीश बापट
अन्न व नागरी पुरवठामंत्री
सिंचन घोटाळ््यात ज्या व्यक्ती दोषी आढळतील त्यांच्यावर पक्ष वगैरेची मुलाहिजा न बाळगता कारवाई होणारच. जे सिंचन प्रकल्प जवळपास पूर्णत्वाकडे पोहोचत आहे, त्यांना प्राधान्य देण्यात येईल. विभागाच्या कामात जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न राहील.
-गिरीश महाजन
जलसंपदामंत्री
राज्य परिवहन मंंडळातर्फे देण्यात येणाऱ्या सवलतींचा फायदा घेण्यासाठी ‘बोगस’ कागदपत्रांचा आधार घेण्यात येतो. तहसीलदारांचे प्रमाणपत्र धारण करणाऱ्यांनाच सवलत देण्याची भूमिका असेल. ‘शिवनेरी’ बस ‘सीएनजी’वर चालविण्याचा विचार आहे.
-दिवाकर रावते
परिवहनमंत्री

Web Title: Happy Ministers of the Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.