ट्रीपल आयटी पहिल्याच वर्षी हाऊसफुल्ल

By Admin | Updated: July 3, 2016 19:21 IST2016-07-03T19:21:44+5:302016-07-03T19:21:44+5:30

उपराजधानीला मंजूर करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ट्रीपल आयटीची (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) सुरुवात दणक्यात झाली आहे.

Happy first year in triple IT | ट्रीपल आयटी पहिल्याच वर्षी हाऊसफुल्ल

ट्रीपल आयटी पहिल्याच वर्षी हाऊसफुल्ल

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. ३  : उपराजधानीला मंजूर करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ट्रीपल आयटीची (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) सुरुवात दणक्यात झाली आहे. स्थापनेच्या पहिल्या वर्षातच येथील सर्वच्या सर्व ८० जागांवर प्रवेश झाले आहेत. नवीन संस्था असूनदेखील विद्यार्थ्यांनी नागपूरवर विश्वास दाखविला आहे. ह्यट्रीपल आयटीह्णला जागेचे हस्तांतरण करण्यात आले असून विकास कामांसाठी ४ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीच रविवारी ही माहिती दिली.
ह्यट्रीपल आयटीह्णनंतर बऱ्याच उशीरा ह्यआयआयएमह्णची घोषणा झाली. परंतु ह्यआयआयएमह्णचे वर्ग मागील वर्षी सुरूदेखील झाले. त्यामुळे ह्यट्रीपल आयटीह्णचे वर्ग कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. अखेर आॅगस्टपासून येथील वर्ग सुरू होतील असा निर्णय झाला आहे. ह्यट्रीपल आयटीह्णसंदर्भात रविवारी मुख्यमंत्र्यांनी हैद्राबाद हाऊस येथे आढावा घेतला. यावेळी यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सिताराम कुंटे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कुंटे यांनी ह्यट्रीपल आयटीह्णसाठी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांसंदर्भात माहिती दिली.
ह्यबीएसएनएलह्णच्या ह्यआरटीटीसीह्णची (रिजनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटर) येथे या संस्थेचे तात्पुरते वर्ग सुरू असून येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ह्यट्रीपल आयटीह्णची पहिल्या वर्षीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून येथे ९ विभागप्रमुखांच्या नियुक्त्यादेखील झाल्या आहेत. येथील ७४ पदांना मंजूरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ह्यट्रीपल आयटीह्णही देशातील नामांकित संस्था असून सुरुवातीपासूनच याचा दर्जा राखण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तात्पुरता ह्यकॅम्पसह्णदेखील ह्यडिजीटलह्ण व्हायला हवा व वर्गखोल्यादेखील ह्यस्मार्टह्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: Happy first year in triple IT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.