हप्ता भोवला, मुंबईत पोलिसांची हप्ता वसुली कॅमे-यात कैद
By Admin | Updated: October 19, 2015 13:39 IST2015-10-19T13:37:38+5:302015-10-19T13:39:58+5:30
अंधेरीतील एका पबमध्ये छापा टाकून पबमालकाकडून लाखो रुपयांची लाच मागण्याचा दोघा पोलिसांचा प्रताप व्हिडीओत कैद झाला आहे.

हप्ता भोवला, मुंबईत पोलिसांची हप्ता वसुली कॅमे-यात कैद
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - अंधेरीतील एका पबमध्ये छापा टाकून पबमालकाकडून लाखो रुपयांची लाच मागण्याचा दोघा पोलिसांचा प्रताप व्हिडीओत कैद झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच मुंबईचे पोलिस आयुक्त जावेद अहमद यांनी चौकशीचे आदेश दिले असून या व्हिडीओत आणखी पोलिस आहेत का याचा तपास केला जात आहे.
यूट्यूबवर चार दिवसांपूर्वी एक मिनीटांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओत पोलिस निरीक्षक शशिकांत जगदाळे आणि कॉन्स्टेबल आल्हाद गायकवाड हे दोघे दिसत आहेत. संभाषणावरुन पोलिसांनी अंधेरीतील एका ख्यातनाम पबवर छापा टाकल्याचे दिसते. छापा टाकल्यावर या दोघा पोलिसांनी पब मालकासोबत तडजोडीसाठी चर्चा सुरु केली. यामध्ये त्यांनी लाखो रुपयांची मागणीही पबमालकाकडे केली आहे. जगदाळे हे सध्या दहशतवादविरोधी पथकाच्या जुहू युनिटमध्ये असून गायकवाड हे क्राईम ब्रँचचे एसीपी सुनील देशमुख यांचे चालक म्हणून कार्यरत आहेत. या व्हिडीओत पबमधील कर्मचारी पोलिसांना आधी दिलेली रक्कम आणि उर्वरित रक्कम कधी देणार याचा उल्लेख करताना दिसतात. या व्हिडीओमुळे मुंबई पोलिसांची नाचक्की झाली असून पोलिसांनी या व्हिडीओचा तपास सुरु केला आहे.