‘त्या’ चौघांवर अटकेची टांगती तलवार
By Admin | Updated: October 28, 2015 02:30 IST2015-10-28T02:30:44+5:302015-10-28T02:30:44+5:30
प्रख्यात बिल्डर सूरज परमार यांच्या ‘सुसाईड नोट’मध्ये उल्लेख असलेल्या चारही नगरसेवकांना तात्पुरता जामीन देण्यास ठाणे न्यायालयाने मंगळवारी नकार दिल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता बळावली आहे.

‘त्या’ चौघांवर अटकेची टांगती तलवार
ठाणे : प्रख्यात बिल्डर सूरज परमार यांच्या ‘सुसाईड नोट’मध्ये उल्लेख असलेल्या चारही नगरसेवकांना तात्पुरता जामीन देण्यास ठाणे न्यायालयाने मंगळवारी नकार दिल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता बळावली आहे.
परमार यांच्या ‘सुसाईड नोट’मध्ये विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण या नगरसेवकांची नावे असल्याचे पोलिसांनी मंगळवारी जाहीर केले. त्यामुळे या नगरसेवकांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मंगळवारी अर्ज केला. चव्हाण यांच्या अर्जावर २९ आॅक्टोबरला तर जगदाळे, मुल्ला आणि विक्रांत यांच्या अर्जावर ३१ आॅक्टोबरला
सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यावर अर्जावरील सुनावणी होईपर्यंत त्यांना अटक होऊ नये, अशी मागणी या नगरसेवकांच्या वकीलांनी केली. मात्र, असा तात्पुरता जामीन मंजुरीस न्यायालयाने नकार दिल्याने त्यांच्या अटकेची तलवार कायम आहे.
परमार कुटुंबियांना संरक्षण
या नगरसेवकांची नावे जाहीर करतांनाच पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरविल्याची माहिती सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली.
परमार आत्महत्या घटनाक्रम
* ७ आॅक्टोबरला बिल्डर सूरज परमार यांची आत्महत्या
* या प्रकरणात ‘गोल्डन गँग’चा हात असल्याची चर्चा
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांची तक्रार
* परमार यांना न्याय मिळण्यासाठी ठाण्यातील बिल्डर एकवटले
* चार नगरसेवकांची नावे व्हॉटअॅपवर व्हायरल
* मुख्यमंत्र्यांचे नगरसेवकांसह सूत्रधारांवर कारवाईचे संकेत
* पोलिसांकडून चार नगरसेवकांची नावे अधिकृतपणे जाहीर
* तात्पुरता जामीन देण्यास न्यायालयाचा नकार
...............................