जवखेडय़ातील दोषींना फाशी द्या
By Admin | Updated: November 12, 2014 02:00 IST2014-11-12T02:00:01+5:302014-11-12T02:00:01+5:30
पुरोगामी महाराष्ट्रात घडलेले तिहेरी हत्याकांड राज्याला कलंक आह़े आरोपींना दया न दाखविता फासावर चढविले पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केल़े

जवखेडय़ातील दोषींना फाशी द्या
अण्णा हजारे : संयम ठेवण्याचे आवाहन
पाथर्डी (जि. अहमदनगर) : पुरोगामी महाराष्ट्रात घडलेले तिहेरी हत्याकांड राज्याला कलंक आह़े आरोपींना दया न दाखविता फासावर चढविले पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केल़े
हजारे यांनी मंगळवारी जवखेडे खालसा येथे पीडित जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केल़े ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य आणि नगर जिल्हा संतांची भूमी आह़े मात्र, अशा घटना घडणो हे दुर्दैवी आह़े राळेगणसिद्धीत या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढून निषेध नोंदविला आहे. सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आगामी काळात खेडय़ापाडय़ांत जाऊन जनजागृती निर्माण करणो गरजेचे आहे. घटनेला तीन आठवडे उलटत असताना हत्या करणा:यांचा अद्याप शोध लागलेला नाही़ (प्रतिनिधी)
जनहित याचिका
मुंबई : अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातील जावखेडे येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाविरोधात दाखल झालेल्या फौजदारी जनहित याचिकेवर तत्काळ सुनावणी न घेता यावर येत्या काही दिवसांत सुनावणी घेतली जाईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केल़े