शेकडो लोकांसमोर महिलेला बेदम मारहाण

By Admin | Updated: February 28, 2016 01:19 IST2016-02-28T01:19:58+5:302016-02-28T01:19:58+5:30

मुंबई येथील एका अडतीस वर्षीय महिलेला शेकडो लोकांसमोर बेदम मारहाण करून कपडे फाडण्यात आले. शनिवारी दुपारी येथील एसजीपीडीए मार्केटजवळ ही घटना घडली. मारहाण

Handsome assault in front of hundreds of people | शेकडो लोकांसमोर महिलेला बेदम मारहाण

शेकडो लोकांसमोर महिलेला बेदम मारहाण

मडगाव : मुंबई येथील एका अडतीस वर्षीय महिलेला शेकडो लोकांसमोर बेदम मारहाण करून कपडे फाडण्यात आले. शनिवारी दुपारी येथील एसजीपीडीए मार्केटजवळ ही घटना घडली. मारहाण करणाऱ्यांमध्ये एक पुरुष तसेच काही महिला होती. बायलांचो एकवोट या संघटनेच्या अध्यक्षा आवदा व्हिएगस यांना ही माहिती मिळाल्यानतंर त्यांनी मडगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधितेची सुटका केली आणि त्या दोघांना अटक केली.
मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे संशयितांच्या कुटुंबातील एका पुरुषाशी संबंध होते. त्यामुळेच ही मारहाण केली, असा दावा संशयित घटनास्थळी करत होते. जोलिना व सानविता या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. जॉलिना डायस, सार्विटा कार्व्हालो (रा. माजोर्डा, ता. सासष्टी), गॉडविन, अनिता, ज्योविता अन्य दोन अनोळखींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Handsome assault in front of hundreds of people