हात उकळत्या तेलात बुडविले!
By Admin | Updated: November 5, 2015 00:19 IST2015-11-05T00:19:46+5:302015-11-05T00:19:46+5:30
माहेरहून १० हजार रुपये आणत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचे हात उकळत्या तेलात बुडविल्याची संतापनजक घटना केज तालुक्यातील देवगाव येथे घडली.

हात उकळत्या तेलात बुडविले!
बीड : माहेरहून १० हजार रुपये आणत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचे हात उकळत्या तेलात बुडविल्याची संतापनजक घटना केज तालुक्यातील देवगाव येथे घडली. महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
करुणा मल्हारी वाघमारे (२५) असे पीडित महिलेचे नाव आहे. माहेरहून पैसे आणण्यासाठी करुणाचा सासरच्या मंडळीकडून छळ सुरू
होता. वारंवार मागणी करुनही पैसे आणत नसल्याचा राग तिच्या सासरच्या मंडळींना होता. ३१ आॅक्टोबरला सायंकाळी ७ च्या सुमारास गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकून ते उकळविण्यात आले.
त्यानंतर करुणाचा पती, सासरा,
सासू, सून, दीर व जाऊ यांनी बळजबरीने तिचे हात उकळत्या तेलात बुडविले. मनगटापर्यंत तिचे हात भाजले आहेत.
करुणाला बुधवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात
आले. जिल्हा रुग्णालयातील चौकी पोलिसांनी तिचा जबाब घेतला
आहे. पती मल्हारी सोपान वाघमारे, सासरा सोपान वाघमारे, दीर विक्रम सोपान वाघमारे, जाऊ राणी विक्रम वाघमारे व सासूने हे कृत्य केल्याचे तिने पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत केज ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. (प्रतिनिधी)