पुन्हा ‘वर्दी’वर उचलला हात

By Admin | Updated: March 14, 2016 02:47 IST2016-03-14T02:47:19+5:302016-03-14T02:47:19+5:30

लातूर जिल्ह्यातील पानगाव, बीड तसेच ठाणे येथील पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना ताज्या असतानाच अंबाजोगाईत एका पोलिसाला तरुणाने बेदम मारहाण करून खाकी वर्दी फाडल्याची घटना रविवारी पहाटे घडली

Hands again lifted on 'uniform' | पुन्हा ‘वर्दी’वर उचलला हात

पुन्हा ‘वर्दी’वर उचलला हात

अंबाजोगाई (जि. बीड) : लातूर जिल्ह्यातील पानगाव, बीड तसेच ठाणे येथील पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना ताज्या असतानाच अंबाजोगाईत एका पोलिसाला तरुणाने बेदम मारहाण करून खाकी वर्दी फाडल्याची घटना रविवारी पहाटे घडली.
संतोष हरिश्चंद्र चाटे असे या पोलीस नाईकाचे नाव आहे; तर हल्लेखोर योगेश रेवानंद गुजर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक चाटे हे आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी रात्री गस्तीवर होेते. शहरातील मोंढा परिसरात गस्त घालत असताना योगेश गुजर या तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू केली. पण योगेशने अरेरावी करीत चाटे यांची कॉलर पकडून मारहाण केली. झटापटीत चाटे यांच्या अंगावरील खाकी वर्दी फाटली.
पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना हुलकावणी देत योगेश तेथून पळाला. या प्रकरणी चाटे यांच्या फिर्यादीवरून गुजरविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Hands again lifted on 'uniform'