‘हँडल मॅग्नेटगॅस १७’ टिष्ट्वटरने केले बंद
By Admin | Updated: May 15, 2015 02:05 IST2015-05-15T02:05:27+5:302015-05-15T02:05:27+5:30
हँडल @मॅग्नेटगॅस १७’ हे अकाऊंट टिष्ट्वटरने बंद केले आहे. इसिसला(इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरिया) जाऊन मिळालेल्या कल्याणच्या

‘हँडल मॅग्नेटगॅस १७’ टिष्ट्वटरने केले बंद
डिप्पी वंकाणी, मुंबई
‘हँडल @मॅग्नेटगॅस १७’ हे अकाऊंट टिष्ट्वटरने बंद केले आहे. इसिसला(इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरिया) जाऊन मिळालेल्या कल्याणच्या तीन तरुणांपैकी एकाने भारतविरोधातील संदेश पोस्ट करण्यासाठी या अकाऊंटचा वापर केला होता.
हा ‘हँडल’ भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या नजरेखाली कसा आला, तो भारतीय तरुणांना इसिससाठी काम करण्यास कशी आमिषे दाखवीत आहे व भारताविरोधात त्याच्या कारवायांची चर्चा कशी सुरू आहे, याची बातमी पहिल्यांदा ‘लोकमत’ने २४ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केली होती.
धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, असे सांगून कल्याणचे चार तरुण इतर लोकांसोबत देशाबाहेर गेले व तेथून त्या गटातील लोकांना मागे ठेवून इराकमधून मोसूलमध्ये शिरले. तेथे ते इसिसला मिळाले. नंतर त्यापैकी अरीब माजिद भारतात परतला. इतर तिघे अजूनही इराकच्या सैन्याशी इसिससाठी लढत आहेत.
इतर तिघांपैकी (सलीम टंकी, अमन तांडेल आणि फाहद शेख) फाहद शेख याने ‘हँडल @ मॅग्नेटगॅस १७’ सुरू केल्याचा संशय आहे. या ‘हँडल’वर भारतीय प्रसार माध्यमांवर टीका करणारा संदेश (मेसेज) होता. त्यात म्हटले होते : अबू तौहीद अल हिंदी इन द लॅण्ड आॅफ खलीफ. इंडियन मिडिया-ओन्ली फ्यू जॉईन टू आयएस फ्रॉम इंडिया. वुई-डाय इन युवर पेज.
चेहरा झाकलेल्या एकाच्या हातात स्वयंचलित रायफल असून त्याने आकाशाकडे बोट केले आहे, अशी सहा छायाचित्रे या टिष्ट्वटर हँडलवर
पोस्ट करण्यात आली होती. या छायाचित्रांनी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एनआयए) लक्ष वेधले गेले होते.
गुप्तचर यंत्रणेतील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘अल हिंदी’ हे नाव इसिसला मिळालेल्या भारतीयांना देण्यात आले आहे. ‘इन द लँड आॅफ खलिफा’ या संकेताचा अर्थ असा की, ज्यांची
भरती झाली होती त्यांनी अत्याधुनिक प्रशिक्षण घेतले असून इसिसचा प्रमुख अबुबकर अल बगदादी हा सध्या ज्या भागात तळ ठोकून आहे त्या भागाजवळ त्यांना ठेवण्यात आले आहे. आत्मघाती बाँबर म्हणून लष्करी पातळीवर ज्यांचे प्रशिक्षण झाले आहे त्यांच्यासाठी ‘इन द लँड आॅफ खलिफा’ असा शब्दप्रयोग केला जातो.