ग्रामीण भागातील महिलांसाठी हातसडीच्या तांदळाचा उपक्रम
By Admin | Updated: April 30, 2016 03:20 IST2016-04-30T03:20:14+5:302016-04-30T03:20:14+5:30
विक्रममगड तालुका हा आदिवासी भाग असून येथील मुख्य व्यावसाय व उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे भातशेती आहे़

ग्रामीण भागातील महिलांसाठी हातसडीच्या तांदळाचा उपक्रम
विक्रमगड/तलवाडा : विक्रममगड तालुका हा आदिवासी भाग असून येथील मुख्य व्यावसाय व उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे भातशेती आहे़ या तालुक्यात गावठी तांदुळ मोठया प्रमाणावर पिकवला जातो़ या तांदळाला बाहेर व तालुक्यातही मोठी मागणी आहे़ या पार्श्वभूमीवर येथील आदिवासी महिलांनी बचतगटांच्या माध्यमातुन घरातच हातसडीच्या तांदळाचा उपक्रम राबविल्यास मोठा स्वयंरोजगार उपलब्ध होउ शकतो असे विक्रमगड येथील राईसमिलमध्ये पावसाळयासाठी भात भरडाई करण्यासाठी आलेल्या आदिवासी शेतकरी जयराम लक्षी भावर यांनी यावेळी सांगीतले़
आता गाव-खेडयापाडयातील महिलाही चक्कीमध्ये जाऊन भाताची भरडाई व डबल पॉलिक करुन घेतात त्यामध्ये जो हातसडीच्या तांदुळातुन कस मिळु शकतो तो पॉलिश केलेल्या व मिलमध्ये भरडाई केलेल्या तांदळात नाही़ आज हा तांदुळ हातसडीचा तांदुळ दुर्मिळ झाला असुन त्याची मागणी वाढली आहे़ त्याअनुशंगाने हातसडीचा तांदुळ येथील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून तयार करुन त्याची विक्री केल्यास एक स्वयंरोजगार मिळु शकतो़
या भागातील उत्कृष्ट प्रतीच्या (गावठी) तांदळाचा वापर करुन हातसडीचा तांदुळ तयार करता येतो़. हा तांदुळ लाकडाच्या उभ्या खोलगट उखळीत टाकुन लाकडाच्या गोल मुसळाच्या साहायाने अंगमेहनीतीने सडला जातो़ त्यामुळे भाताच्या टरफलाखालील नैसर्गीक असलेली बी जीवनसत्वे, खनिजे, प्रोटीन या तांदळात असल्याने बी जिवनसत्वाच्या अभावाने होणारे बेरीबेरी, अशक्तपणा, तोंड येणे, पचनक्रियेत दोष, आळस, हातपायांना मुंग्या, स्रायुंना पेटके आदी रोग होत नाहीत़
दोन वर्षापुर्वी विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाडा आणि आजुबाजुच्या आदिवासी भागातील महिलांना घरबसल्या स्वयंरोजगार मिळावा या उददेशाने हातसडीच्या तांदळाचा रोजागार उपलब्ध करुन देण्यात आला होता़ विक्रमगड कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हातसडीचा तांदुळ तयार करण्याच नियोजन आणि संकल्पना तसेच कृषी क्षेत्रातील महिलांचा सहभाग या योजनेअंतर्गत उपक्रम राबविला आला होता व राबविला जाऊ शकतो़. (वार्ताहर)