‘भानामती’मागे त्यांच्याच सावत्र मुलांचे हात!
By Admin | Updated: November 8, 2014 03:37 IST2014-11-08T03:37:26+5:302014-11-08T03:37:26+5:30
घर बंद असताना घाण पडणे, अचानक कपड्यांना आग लागणे हा सर्व प्रकार त्यांचीच सावत्र दोन मुले करायची, अशी माहिती ‘लोकमत स्टिंग आॅपरेशन’मधून शुक्रवारी उघड झाली

‘भानामती’मागे त्यांच्याच सावत्र मुलांचे हात!
विनोद जाधव ,लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद)
घर बंद असताना घाण पडणे, अचानक कपड्यांना आग लागणे हा सर्व प्रकार त्यांचीच सावत्र दोन मुले करायची, अशी माहिती ‘लोकमत स्टिंग आॅपरेशन’मधून शुक्रवारी उघड झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)च्या सहकार्याने ‘लोकमत’ने हे कथित भानामतीचे ‘भूत’ उतरविले.
गंगापूर तालुक्यातील टोकी गाव एका अनामिक भीतीने गेल्या काही दिवसांपासून हादरून गेले होते़ घर बंद, तरीही घरात घाण येणे, अंगावरील तसेच घरातील कपड्यांनी पेट घेणे, घरातच फटाका फुटणे, अशा घटना घडत असल्याने कथित भानामतीची चर्चा होती. सखाहरी शेजवळ यांच्या घरातील या विचित्र प्रकारांमुळे संपूर्ण गाव दीड महिना त्रस्त होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने ५ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले होते. केवळ बातमी प्रसिद्ध करून न थांबता ‘लोकमत’ने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकासह शुक्रवारी ‘स्टिंग आॅपरेशन’ करुन अधंश्रध्देचा पर्दाफाश केला.