चिमुरड्यांच्या मदतीसाठी सरसावले चिमुकले हात
By Admin | Updated: November 16, 2014 23:52 IST2014-11-16T23:31:50+5:302014-11-16T23:52:11+5:30
विद्यार्थ्यांची श्रीमंती : कपड्यांबरोबरच बिस्किटांचा खाऊही मुलांनी गोळा केला--इनिशिएटिव्ह

चिमुरड्यांच्या मदतीसाठी सरसावले चिमुकले हात
सातारा : झोपड्यांमध्ये थंडीनं कुडकुडणाऱ्या चिमुरड्यांला ऊबदार कपडे मिळावीत, यासाठी ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला सातारारकर त्याला भरभरून प्रतिसाद देत असून आता या उपक्रमात शालेय मुलंही हिरीरीने सहभागी होत आहेत. प्रतापगंज पेठेतील दहा मुला-मुलींनी सोसायटीतील---२०० जाकिटांची भेट
सातारा येथील मंगळवार पेठेतील मेहबूब हाजीसाब शेख यांनी थंडीनं कुडकुडणाऱ्या चिमुरड्यांसाठी दोनशे ऊबदार जाकिटांची भेट दिली आहे. घराघरात जाऊन या अभागी मुलांसाठी कपडे आणि बिस्किटांचे पुडे गोळा करून ‘लोकमत’ कार्यालयात आणून दिले आहेत.येथील प्रतापगंज पेठेतील शिवसाई अपार्टमेंटमधील स्नेहल पवार, भक्ती जोशी, संकेत दिवघरे, सागर दिवघरे, शिवम मांडवेकर, ऋषभ ओसवाल, अभिभाव जाधव, आदेश निकम, अभिषेक सुतार, गोपाळ राठोड, यश मिळविणे, कुलदीप राठोड, अवधूत पाटील, प्रवीण पाटील यांनी आपल्या सोसायटीमधील ४२ कुटुंबांकडून कपडे गोळा केली. तसेच कपड्यांबरोबरच चिमुरड्यांना खाऊ द्यावा, यासाठी मुलांनी बिस्किटांचे पुडेही दिले आहेत. ‘लोकमत’मध्ये बातमी वाचून आपणही या चिमुरड्यांच्या मदतीसाठी उपक्रमात सहभागी व्हावं, असं ठरवून आम्ही कपडे गोळा केली. सोसायटीतील लोकांनीही आम्हाला सहकार्य केल्याचे मुलांनी सांगितले. तामजाईनगर येथील चंद्रकांत चव्हाण, आसगाव, ता. सातारा येथील माजी सरपंच राजेंद्र गुरव, शिवतेज, गुरव, समृद्धी गुरव यांनीही रविवारी कार्यालयात कपडे आणून दिली आहेत. (लोकमत टीम)
चिमुरड्यांसाठी
५० नवीन ड्रेस
शाहूपुरी येथील दिव्यनगरीतील एका महिलेने झोपड्यांमधील अभागी चिमुरड्यांसाठी ५० नवीन ड्रेस देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.रामाचा गोट येथील इंद्रजित ढोणे यांनी विनामोबदला आपली चारचाकी गाडी कपड्यांची वाहतूक करण्यासाठी दिली.