‘राजकीय’ इमारतीवर हातोडा
By Admin | Updated: February 11, 2015 06:21 IST2015-02-11T06:21:54+5:302015-02-11T06:21:54+5:30
गेल्या दोन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या वरळी येथील शुभदा-सुखदा इमारतीतील बेकायदा बांधकामांवर मुंबई महापालिकेने कारवाई

‘राजकीय’ इमारतीवर हातोडा
मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या वरळी येथील शुभदा-सुखदा इमारतीतील बेकायदा बांधकामांवर मुंबई महापालिकेने कारवाई केली़ राजकीय नेत्यांचे निवासस्थान असलेल्या शुभदा इमारतीच्या १३ गाळ्यांतील बेकायदा बदल व बांधकामे तोडण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली़
या इमारतींमधील फ्लॅट्सच्या वापरामध्ये बेकायदा बदल व काही फ्लॅट्समध्ये बेकायदा बांधकामे केली होती़ माहितीच्या अधिकाराखाली हे प्रकरण उजेडात येताच पालिकेने संबंधित सोसायटीला नोटीस पाठविण्यास सुरुवात केली़ मात्र गेली दोन वर्षे या इमारतींवरील कारवाई लांबणीवर पडत होती़ अखेर राज्यात सत्तांतर होताच चक्रे वेगाने फिरू लागली़ यानुसार अनेक महिन्यांपासून रखडलेले पोलीस बळही आज पालिकेच्या जी दक्षिण विभागाला मिळाले़ त्यामुळे दुपारी १२़१५ वाजल्यापासून कारवाई सुरु झाली़ संध्याकाळी ६़४०पर्यंत दुकानात रूपांतर झालेल्या फ्लॅट्समधील १३पैकी १२ गाळे तोडण्यात आले; तर २ बेकायदा बांधकामे राहण्यास अयोग्य करण्यात आली़ या कारवाईत अडथळा आणण्यास कोणीच पुढे न आल्याने तोडकाम वेगाने पार पडले़ (प्रतिनिधी)