कॅम्पा कोलावर आज पडणार हातोडा!
By Admin | Updated: June 20, 2014 02:43 IST2014-06-20T02:43:54+5:302014-06-20T02:43:54+5:30
स्थानिक ज्येष्ठ नागरिकाच्या निधनामुळे तीन दिवसांकरिता टळलेली कॅम्पा कोला कम्पाउंडमधील बेकायदा मजल्यांवरील कारवाई अखेर उद्या सुरू होत आह़े

कॅम्पा कोलावर आज पडणार हातोडा!
>मुंबई : स्थानिक ज्येष्ठ नागरिकाच्या निधनामुळे तीन दिवसांकरिता टळलेली कॅम्पा कोला कम्पाउंडमधील बेकायदा मजल्यांवरील कारवाई अखेर उद्या सुरू होत आह़े मात्र या वेळेस कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणा:या रहिवाशांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आह़े
गेल्या रविवारी कॅम्पा कोलातील रहिवासी विनोद कोठारी यांचे निधन झाल्याने सोमवारची नियोजित कारवाई 19 जूनर्पयत पुढे ढकलण्यात आली होती़ त्यानुसार उद्या सकाळी 11़3क्च्या दरम्यान पालिका अधिका:यांचे पथक महानगर गॅस व बेस्टच्या कर्मचा:यांसह कॅम्पा कोलावर पोहोचणार आहे. मात्र यापूर्वी रहिवाशांनी तीनवेळा कारवाईत अडथळा आणला आह़े
त्यामुळे पालिकेने या वेळेस गांधीगिरीने फ्लॅट रिकामे करून घेण्याची तयारी केली आह़े त्यानुसार पोलिसांची मोठी फौज बरोबर न घेता शांततेत कारवाई केली जाणार आह़े तरीही रहिवाशांनी अडथळा आणल्यास कारवाई बंद करून पालिका माघारी परतेल़ परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी स्पष्ट केल़े (प्रतिनिधी)
कॅम्पा कोला येथील 35 बेकायदा मजल्यांवरील 1क्2 फ्लॅट्सचे गॅस व वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई उद्यापासून सुरू होईल़ महानगर गॅस, बेस्ट व पालिकेचे प्रत्येकी 15 कर्मचारी या कारवाईत सामील होतील़ रहिवाशांनी अडथळा न आणल्यास तीन दिवसांमध्ये ही कारवाई पूर्ण करून बेकायदा फ्लॅटमधील अंतर्गत भिंत तोडण्याचे काम सुरू होईल़
कारवाईचे चित्रीकरण होणार : रहिवासी अडथळे आणत असल्याने कारवाईचे चित्रीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आह़े हे चित्रीकरण सर्वोच्च न्यायालयापुढे सादर करण्यात येईल; तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा गुन्हाही रहिवाशांवर दाखल करण्यात येईल़