सुरक्षारक्षकावर हातोड्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 05:14 IST2016-08-06T05:14:55+5:302016-08-06T05:14:55+5:30

सुरक्षारक्षकावर सहकाऱ्यानेच हातोड्याने हल्ला केल्याची केल्याची घटना एन.एम. जोशी मार्ग परिसरात घडली

Hammer attack on security guard | सुरक्षारक्षकावर हातोड्याने हल्ला

सुरक्षारक्षकावर हातोड्याने हल्ला


मुंबई : सुरक्षारक्षकावर सहकाऱ्यानेच हातोड्याने हल्ला केल्याची केल्याची घटना एन.एम. जोशी मार्ग परिसरात घडली. किशोर सावंत (२५) असे जखमी सुरक्षारक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महालक्ष्मी येथील एआरडीवायझेडएम डिझाइन स्टुडिओमध्ये सावंत सुरक्षारक्षक आहेत. गुरुवारी त्यांच्यासोबत काम करत असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांच्यावर हातोड्याने हल्ला केला. या हल्ल्यात सावंत गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच तेथील कर्मचारी वर्गाने सावंतला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. सावंत आपली गैरहजेरी लावून आपल्याला नोकरीवरून काढून टाकण्याच्या प्रयत्नात असल्याची भीती आरोपीला होती. यातूनच त्याने सावंतवर हल्ला चढविल्याचे तपासात समोर आले. एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी त्याला अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Hammer attack on security guard