भावकीच्या भांडणात चुलत भावाचे दीड महिन्याचे बाळ विहिरीत फेकले
By Admin | Updated: June 21, 2016 22:57 IST2016-06-21T22:57:33+5:302016-06-21T22:57:33+5:30
भावकीच्या जमिनीच्या वादातून दीड महिन्याच्या मुलाला विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना खालूंब्रे ( ता. खेड) येथे वाघेश्वर वस्तीवर घडली. या संतापजनक घटनेत दर्शन अजित उर्फ

भावकीच्या भांडणात चुलत भावाचे दीड महिन्याचे बाळ विहिरीत फेकले
>ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. २१ - भावकीच्या जमिनीच्या वादातून दीड महिन्याच्या मुलाला विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना खालूंब्रे ( ता. खेड) येथे वाघेश्वर वस्तीवर घडली. या संतापजनक घटनेत दर्शन अजित उर्फ राजू बोत्रे या चिमुकल्याचा बडुन मृत्यु झाला आहे. चाकणच्या खालूंब्रे गावात आज सांयकाळी पावणे पाच च्या दरम्यान ही घटना घडली. बोत्रे भावकीच्या कुटुंबियातील जमिनीचा व पाईप लाईनचा वाद चिमुकल्याच्या जीवावर बेतला. चाकण पोलीस स्टेशन मध्ये मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणी अजितचा चुकतभाऊ शिवाजी नामदेव बोत्रे ( वय ३५, रा. खालूंब्रे, ता. खेड, जि. पुणे ) यास अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम. के. ढवाण पुढील तपास करीत आहेत.