राज्यात गारपीटीची शक्यता !
By Admin | Updated: December 31, 2014 00:10 IST2014-12-31T00:10:39+5:302014-12-31T00:10:39+5:30
थंडी वाढणार , कृषी हवामान शास्त्रज्ञांचे भाकीत.

राज्यात गारपीटीची शक्यता !
अकोला : गारपीटीसाठी आवश्यक हवामान बदल होत असून राज्यात येत्या आठवड्यात गारपीट होऊन त्यानंतर थंडीत वाढ होण्याचे भाकीत हवामानशास्त्रज्ञांनी केले आहे.
राज्यातील हवेचा दाब कमी झाला असून तो एक हजार दहा हेप्टापास्कल आहे. बंगालच्या उपसागराकडून वार्याचे ढग राज्याकडे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेश आणि काश्मीरकडून थंड बाष्पाचे वारे राज्यात आल्यास इकडचे गरम वारे त्यामध्ये मिसळून गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भात गारपाटीची शक्यता कमी असून, मराठवाडा, उत्तर व मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरू पाची गरपीट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या चोवीस तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात थंडीची तीव्र लाट असून, मराठवाडयातही या लाटेचा प्रभाव होता. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरसरापेक्षा लक्षणीय घट तर मराठवाडा व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचीत घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. अकोल्याचे किमान तापमान गत चोवीस तासात ६.७ एवढे होते. आद्र्रता ६६ टक्के होती.
गारपीटीसाठी वातावरण तयार होत असले तरी विदर्भात जास्त परिणाम जाणवणार नाही. मराठवाडा, उत्तर व मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरू पाच्या गारपीटीची शक्यता असल्याचे पुणे येथील जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. आर.एन. साबळे यांनी स्पष्ट केले.