शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ-मराठवाड्यात गारपीट, आजही झाेडपणार; पिकांचे नुकसान, नागरिकांचीही तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 06:29 IST

मुंबई महानगर प्रदेशात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाची नोंद होत असून, मुंबईच्या पश्चिम उपनगरात तुरळक सरींची नोंद झाली

मुंबई : गेले सहा दिवस राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस व गारपीट होत असून शनिवारी रात्री व  रविवारी पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात गारपीट झाली. दरम्यान १ मे रोजी पुन्हा गडगडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

पश्चिमी प्रकोपातील साखळ्यामुळे पाऊस, गारपीट होत असून, १ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह अवकाळी पावसाची तीव्रता अधिक जाणवते. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. तर सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे तीव्रता अधिक जाणवेल. मराठवाड्यात ४ मेपर्यंत अवकाळी  वातावरण टिकून राहणार आहे. विदर्भातही ४ मेपर्यंत अवकाळी वातावरणासह पावसाची तीव्रता अधिक राहील, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. मुंबई महानगर प्रदेशात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाची नोंद होत असून, मुंबईच्या पश्चिम उपनगरात तुरळक सरींची नोंद झाली असतानाच ठाण्यात पावसाची मान्सूनसारखी बरसात झाली.

यलो, ऑरेंज अलर्ट१ मे : मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.२ मे : विदर्भात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.३ मे : मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे रविवारी दुपारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे भाजी मंडई आणि हनुमान मंदिर परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. तर वाशिम जिल्ह्यातील सायखेडा परिसरात लिंबापेक्षा माेठ्या आकाराच्या गारा पडल्या. यामुळे पिकांचे नुकसान झाले.

टॅग्स :Rainपाऊस