नारायणपुरात ‘दिगंबरा’चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 01:18 IST2016-07-20T01:18:24+5:302016-07-20T01:18:24+5:30

मध्य प्रदेश, तमिळनाडू, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, कन्याकुमारी, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यांतून आलेले हजारो भाविक उपस्थित होते

Hail of 'Digambara' at Narayanpur | नारायणपुरात ‘दिगंबरा’चा जयघोष

नारायणपुरात ‘दिगंबरा’चा जयघोष


नारायणपूर : श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे गुरुपौर्णिमेनिमित्ताने पहाटेपासून महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, तमिळनाडू, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, कन्याकुमारी, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यांतून आलेले हजारो भाविक उपस्थित होते. नारायणमहाराज यांच्या हस्ते गुरू व्यास महर्षी यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी उपस्थित भाविकांनी ‘दिगंबरा दिगंबरा’चा जयघोष केला. या जयघोषाने हा परिसर दुमदुमला.
देशभरातून आलेल्या भाविकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून त्या भाविकांचा सन्मान करण्यात आला. दत्तमंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने अवघा परिसर लखलखून निघाला होता. चार कोपऱ्यांतून चार भाविकांना पादुका पूजनाचा मान मिळाला. यामध्ये नामदेव जाधव (कुंजीरवाडी, हवेली), गोपीनाथ आगळे (पोखरी, संगमनेर), रमेश बबन भागात (राजुरी, पुरंदर), आनंद शेटे (अकोला, संगनमेर) यांचा समावेश होता. श्री गुरुदेव दत्त यांच्या पादुका व नारायणमहाराज यांचे पूजनप्रसंगी वैधानिक विकास महामंडळाचे मा. अध्यक्ष उल्हास पवार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अ‍ॅड. शशिकांत पागे, अशोक मोहळ, गणेश भिंताडे, डॉ. उमेशकुमार डोंगरे, कन्याकुमारीचे अरुण पाटील, महेश वकील, नितीन निकम, दीपक साळुंखे, मध्य प्रदेशचे वीरेंद्र जैन, मुकेश पटेल, लवीश जैन, भरत क्षीरसागर, बबनभाऊ टकले, एम. के. गायकवाड उपस्थित होते.
>पहाटे ४ ते ६ या काळात पादुका व मूर्तींना रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर ८.३० ते ९ आरती, १० ते ११.३० होमहवन, १२.३० ते २ व्यासपूजन. २.२० ते ३ सदगुरू नारायणमहाराज यांचे प्रवचन, ३ वाजता महाआरती, दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
त्यानंतर नारायणमहाराज यांच्या शिष्यांच्या वतीने नारायणमहाराज यांचे गुरुपूजन व दर्शन सोहळा पार पडला. रात्री ९.३० ते १० वाजता महाआरती झाली. १२.३० ते १ या काळात साजरी आरती झाली.

Web Title: Hail of 'Digambara' at Narayanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.