शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हाफकिनकडूनच सरकारी तिजोरीची लूट; बाजारभावापेक्षाही अधिक दराने केली औषधांची विक्री

By अतुल कुलकर्णी | Published: September 07, 2018 3:24 AM

खुल्या निविदेद्वारे जी औषधे ‘डब्लूएचओ जीएमपी’ मानांकनानुसार स्वस्तात मिळतात ती हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाने अव्वाच्या सव्वा दराने सरकारला दिली आहेत. त्यामुळे सरकारचाच एक विभाग शासनाची लूट करत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : खुल्या निविदेद्वारे जी औषधे ‘डब्लूएचओ जीएमपी’ मानांकनानुसार स्वस्तात मिळतात ती हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाने अव्वाच्या सव्वा दराने सरकारला दिली आहेत. त्यामुळे सरकारचाच एक विभाग शासनाची लूट करत असल्याचे समोर आले आहे.खरेदी धोरण ठरवताना सरकारने हाफकिनकडून औषध खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हाफकिन महामंडळाने उत्पादित केलेल्या औषधांची खरेदी त्यांच्याकडून करता येईल, मात्र त्यांनी ३१ मार्चपूर्वी ई पोर्टलवर त्यांच्या औषधांची यादी जाहीर करण्याचे बंधन घातले.पण हाफकिनने यादी ईपोर्टलवर प्रकाशित केली नाही. औषध खरेदी महामंडळाने पॅरासिटेमॉल सिरपच्या खुल्या निविदा काढल्या, त्यावेळी मात्र हाफकिनने स्वत:चेच औषध घ्यावे अशी मागणी केली. खरेदी महामंडळाच्या निविदा समितीसमोर २१ जून रोजी हाफकिनने १५ रु. ९३ पैसे दर मंजूरही करून घेतला. मात्र कोणतेही कारण न देता ६ जुलैच्या बैठकीत हाच दर १६ रुपये १७ पैसे करून घेतला. खुल्या निविदेत हेच औषध ५ रुपये ८४ पैसे प्रती बाटली देण्यासाठी काही खासगी कंपन्या पुढे आल्या. याचा अर्थ कमी दराने औषध मिळत असतानाही दुप्पट तिप्पट दर हाफकिनला देण्यात आला. असाच प्रकार कफ सिरपच्या बाबतीत घडला. यासाठी काढलेल्या खुल्या निविदेत ७ रुपये ७७ पैसे दर आला. मात्र हाफकिनने २० रुपये ६५ पैसे दर लावला. उच्च न्यायालयाने ‘डब्लूएचओ जीएमपी’ दर्जा असला पाहिजे असा आदेश दिला आहे. मात्र, हाफकिनकडे तो नाही. तरीही महागड्या दराने ही खरेदी केली जात आहे.हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ आणि औषध खरेदी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपद हे एकाच व्यक्तीकडे आहे. त्यामुळे ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’ तयार होतो. मात्र याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. या खरेदीविषयी हाफकिनच्या एमडी संपदा मेहता यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, पॅरासिटेमॉल सिरपचे खरेदी आदेश दिले की नाही हे तपासावे लागेल. कफ सिरपचे आदेश आम्ही अद्याप दिलेले नाहीत. पण आपण जे सांगता ते तपासून पाहू.

टॅग्स :medicinesऔषधंMaharashtraमहाराष्ट्र