शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

अध्यक्षांच्या ३५ कोटींच्या माफीसाठी गॅमनचा आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 05:30 IST

कायद्यातील पळवाट शोधून मोठी कंपनीसुद्धा भागधारकांची कशी फसवणूक करत असते, हे मुंबईच्या गॅमन इंडिया लिमिटेडच्या प्रकरणातून समोर आले आहे.

- सोपान पांढरीपांडेनागपूर : कायद्यातील पळवाट शोधून मोठी कंपनीसुद्धा भागधारकांची कशी फसवणूक करत असते, हे मुंबईच्या गॅमन इंडिया लिमिटेडच्या प्रकरणातून समोर आले आहे.२०१६-१७ मध्ये १६०० कोटी रुपयांचा तोटा झालेली ही कंपनी स्वत:चेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेकराजन यांना मानधनापोटी दिलेले ३५ कोटी रुपये माफ करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.सकृतदर्शनी ही रक्कम क्षुल्लक वाटते. मात्र गॅमन इंडियाचा व्यावसाय अनेक देशांमध्ये आहे. या व्यावसायाचा आवाका बघता पैशांचा गैरव्यवहार कितीतरी अधिक मोठा असू शकतो, असे ‘लोकमत’ जवळील दस्तावेजांवरुन दिसून येते.गॅमन इंडियाच्या २०१६-१७ च्या वार्षिक अहवालानुसार, कंपनीने अध्यक्ष अभिषेक राजन यांना १ एप्रिल २०१२ ते १६ मे २०१६ या कालावधीत ३०.५४ कोटी रुपये अतिरिक्त मानधन दिले. याखेरीज गॅमन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (जीआयपीएल) या उपकंपनीनेही अभिषेक राजन यांना ३.८८ कोटी रुपये अतिरिक्त मानधन दिले. अशाप्रकारे अध्यक्ष राजन यांना ३४.४२ कोटी रुपये मानधन अतिरिक्त देण्यात आले.याचप्रकारे संचालक हिमांशू पारिख यांनाही ५९.८५ लाख रुपये अतिरिक्त मानधन देण्यात आले. पारिख यांनी २०१३ साली पदाचा राजीनामा दिला आहे.अध्यक्ष राजन यांनी संकटकाळात कंपनीला तारुन नेले व कंपनीवरील कर्जाची पुनर्बांधणी केली म्हणून त्यांच्याकडून ही रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात येऊ नये व माफ करावी असा कंपनीचा युक्तिवाद आहे. यामुळेच राजन यांना दिलेले ३०.५४ कोटी रुपये माफ करण्यासासाठी परवानगी द्यावी, असा अर्ज गॅमन इंडियाने कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे केला होता. तो अर्ज कंपनी व्यवहार मंत्रालयाने २४ नोव्हेंबर २०१६ रोजी फेटाळून लावला. त्यानंतरही माघार न घेता गॅमन इंडियाने २९ जून २०१७ ला विशेष आमसभा बोलवली. त्यामध्ये रक्कम माफीचा ठराव चर्चेसाठी ठेवला. त्यातही कंपनीच्या भागधारकांनी ठराव फेटाळून लावला.या प्रकरणी ‘लोकमत’ ने गॅमन इंडियाला ई-मेलही केला. पण ई-मेलमधील प्रश्नांनेही कंपनीकडून उत्तर देण्यात आलेले नाही. नटवरलाल वेपारी अ‍ॅण्ड कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट भागीदार एन. जयेंद्रन (यांची सही अहवालावर आहे) विदेशात असल्याने संपर्क होऊ शकला नाही.गॅमन इंडिया काय आहे?गॅमन इंडिया लिमिटेडची स्थापना १९२२ साली जॉन सी. गॅमन या ब्रिटिश इंजिनिअरने केली आहे. ही जगातील एक मोठी बांधकाम कंत्राटदार कंपनी आहे. अनेक देशात गॅमन इंडियाने इमारती, समुद्री पुल, रस्ते, विमानतळ, इत्यादींचे बांधकाम केले आहे.गॅमन इंडियाच्या ६ उपकंपन्या विदेशात असून भारतीय उपकंपन्या, संयुक्त उपक्रम कंपन्या, विशेष कंपन्या अशा ८० ते ८५ कंपन्या गॅमन इंडियाच्या छत्रछायेत काम करतात. गॅमन समूहाची २०१६ ची उलाढाल ८०७२ कोटी रुपये होती. पण २०१७ चा कंपनीचा व्यावसाय आश्चर्यकारकरित्या १७८८ कोटी रुपयांपर्यंत घसरला. यामुळे उलाढालीपेक्षा घोटाळ्याची रक्कमच मोठी असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र