ज्ञानपीठ विजेते लेखक नेमाडे यांचा गुरुवारी गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2015 04:26 IST2015-05-06T04:26:35+5:302015-05-06T04:26:35+5:30
ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांचा येत्या गुरुवारी ७ मे रोजी गेटवे आॅफ इंडिया येथे राज्य सरकारच्यावतीने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

ज्ञानपीठ विजेते लेखक नेमाडे यांचा गुरुवारी गौरव
मुंबई : ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांचा येत्या गुरुवारी ७ मे रोजी गेटवे आॅफ इंडिया येथे राज्य सरकारच्यावतीने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
‘गौरव ज्ञानपीठ विजेत्यांचा, गौरव मराठी भाषेचा’ या सोहळ््याचे आयोजन सांस्कृतिक विभागाने केले आहे. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर या दिवंगत ज्ञानपीठ विजेत्यांचे स्मरण आणि विद्यमान ज्ञानपीठ विजेते नेमाडे यांचा गौरव असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. चारही ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांच्या कलाकृतीवर आधारित नाट्यप्रवेश, अभिवाचन व गायन असे कार्यक्रम यावेळी सादर केले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नेमाडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यातील प्रकाशक, प्रसारमाध्यमांचे व नियतकालिकांचे संपादक, कलाकार, सार्वजनिक ग्रंथालये तसेच लोकप्रतिनिधी यांना या कार्यक्रमास निमंत्रित केल्याचे तावडे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)