'सैनिकांसाठी सीमेवर गायचंय' - आशा भोसले

By Admin | Updated: January 24, 2017 08:01 IST2017-01-24T03:43:29+5:302017-01-24T08:01:56+5:30

‘आपले प्राण हातात घेऊन जीवाची बाजी लावून देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी मला सीमेवर जाऊन गायचे आहे.

'Guys at the border for soldiers' - Asha Bhosale | 'सैनिकांसाठी सीमेवर गायचंय' - आशा भोसले

'सैनिकांसाठी सीमेवर गायचंय' - आशा भोसले

सातारा : ‘आपले प्राण हातात घेऊन जीवाची बाजी लावून देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी मला सीमेवर जाऊन गायचे आहे. जीवनातले हे समाधान मला मिळवायचे आहे,’ अशी भावना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यक्त केली.
कऱ्हाड तालुक्यातील आपल्या जमिनीच्या प्रकरणाबाबत आशा भोसले मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांची त्यांनी भेट घेतली. त्या म्हणाल्या, मी सध्या गाणे कमी केले आहे. जीवनात मी खूप गायले परंतु सीमेवर जाऊन सैनिकांसाठी विनामोबदला गायचं आहे, असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)

Web Title: 'Guys at the border for soldiers' - Asha Bhosale