आणखी वर्षभर गुटखाबंदी
By Admin | Updated: July 18, 2015 00:09 IST2015-07-18T00:09:02+5:302015-07-18T00:09:02+5:30
गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवर राज्य सरकारने घातलेली बंदी आणखी एक वर्षापर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आणखी वर्षभर गुटखाबंदी
मुंबई : गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवर राज्य सरकारने घातलेली बंदी आणखी एक वर्षापर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे केली.
राज्यात अन्न व औषधी प्रशासनाने ही बंदी यापूर्वीच घातली होती. या बंदीची मुदत १९ जुलै रोजी संपत आहे. कायद्यानुसार एक वर्षासाठी ही बंदी घालता येते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आणखी एक वर्षासाठी बंदीची घोषणा केली.