बंदी असूनही गुटखा उत्पादन!
By Admin | Updated: April 7, 2015 04:49 IST2015-04-07T04:49:01+5:302015-04-07T04:49:01+5:30
राज्यात गुटखा विक्री आणि उत्पानाला बंदी असतानाही गुटख्याचे अवैध उत्पादन होत असल्याची कबुली अन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीश बापट

बंदी असूनही गुटखा उत्पादन!
मुंबई : राज्यात गुटखा विक्री आणि उत्पानाला बंदी असतानाही गुटख्याचे अवैध उत्पादन होत असल्याची कबुली अन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी विधानसभेत दिली. गुटखा बंदीचा कायदा अधिक कडक करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे देशात तंबाखू विक्रीशी संबंधित नियमांच्या समीक्षेसाठी नेमलेल्या संसदीय समितीचे अध्यक्ष दिलीप गांधी यांच्यासह श्यामचरण गुप्ता आणि रामप्रसाद सरमाह या भाजपा खासदारांनी तंबाखूविषयी केलेली वक्तव्य आधीच अपचनी पडली आहेत. त्यात आता अन्न व औषधी प्रशासन मंत्री बापट यांनी गुटख्याच्या अवैध उत्पादनाबाबतचे वास्तव कबूल केल्याने तंबाखूजन्य पदार्थांची ‘किक’ चांगलीच बसली आहे. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शहाड, जि.ठाणे येथे गोदामातून जप्त केलेल्या गुटख्यासंदर्भात राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला.
त्यावर उत्तर देताना बापट म्हणाले, की या प्रकरणात
साडेनऊ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला व बंटी श्रीचंद
सलानी या मालकाला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध कलम
३५८ अन्वये गुन्हा दाखल केल्याने त्याला २० दिवस जेलमध्ये जावे लागले, अशी माहिती बापट यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)