आम्हाला कोणी गुरूजी देतय का...गुरूजी !

By Admin | Updated: July 19, 2016 20:52 IST2016-07-19T20:52:03+5:302016-07-19T20:52:03+5:30

आम्हांला गुरुजी द्या हो . . . .असा टाहो फोडत गुरूपोर्णिमेच्या दिवशीच विद्यार्थ्यांनी थेट गटशिक्षण अधिकाऱ्याच्या दालळनात मंगळवारी शाळा भरवली.

Guruji is giving us any Guruji ... | आम्हाला कोणी गुरूजी देतय का...गुरूजी !

आम्हाला कोणी गुरूजी देतय का...गुरूजी !

ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 19 -  आम्हांला गुरुजी द्या हो . . . .असा टाहो फोडत गुरूपोर्णिमेच्या दिवशीच विद्यार्थ्यांनी थेट गटशिक्षण अधिकाऱ्याच्या दालळनात  मंगळवारी शाळा भरवली.  पाटोदा तालुक्यातील बांगरवाडी येथील विद्यार्थी गट शिक्षण अधिकारी कार्यालयात पोचले. यावेळी केवळ चार कर्मचारी कार्यालयात होते.  तहसीलदारांनी कार्यालयाचा पंचनामा केला .
शहरापासून ३ कि.मी. अंतरावर बांगरवाडी हे गाव आहे. नगर पंचायत कक्षेत असणाऱ्या या गावात चौथीपर्यंत शाळा असून, २९ विध्यार्थी प्रवेशित आहेत. शाळेसाठी एस. व्ही. झांजुर्ने आणि यू.जे. गोरे या दोन शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. झांजुर्ने तीन आठवड्यापासून शाळेत उपस्थित नाही तर गोरे याही सुटीवर गेल्याने मंगळवारी शाळेत शिक्षकच नव्हते. बांगरवाडी येथील पालकांनी यापूर्वी अनेकवेळा तक्र ारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे चिडलेल्या पालकांनी विद्यार्थी घेऊन थेट गट शिक्षण अधिकारी कार्यालय गाठले
पालक बंडू काळे, नगर पंचायतचे शिक्षण सभापती सूरज कांकरिया, नगरसेवक राजू जाधव, शंकर काळे, रामभाऊ तांबारे, कचरु  काळे, बळीराम सस्ते, विठ्ठल काळे, रामभाऊ काळे, महादेव भिसे, भागवत काळे, मनोज अर्सुळ, दत्ता जाधव, कृष्णा तांबारे, राहुल काळे यांनी विद्यार्थ्यांसह ठिय्या दिला.  कार्यालयात केवळ एस. बी. सपकाळ, एस. जी. धोंडे हे कनिष्ठ सहायक व दोन परिचर उपस्थित होते.
दरम्यान पंचनामा सुरू असताना गट शिक्षण अधिकारी  कार्यालयात दाखल झाले. शाळेसाठी कोठूळे या शिक्षकाची  नियुक्ती केली आणि वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. गट शिक्षण अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने सर्वच शाळांचे नुकसान झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. ऐन गुरू पोर्णिमेच्या दिवशीच दिवशी विद्यार्थ्यांना गुरूंची मागणी करावी लागली. 
तहसीलदार मुकेश कांबळे यांनी नायब तहसीलदार एस. व्ही. ढाकणे यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. 
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंचनामा होईपर्यंत काही ह्यदांड्याबहाद्दूरह्ण कर्मचाऱ्यांनी हजेरीपटावर सह्या करून तहसील प्रशासनाच्या डोळ्यातही धूळफेक केली असल्याचे समोर आले.

Web Title: Guruji is giving us any Guruji ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.