सीएमआयएच्या अध्यक्षपदी गुरप्रीतसिंग बग्गा
By Admin | Updated: June 28, 2016 22:02 IST2016-06-28T22:02:13+5:302016-06-28T22:02:13+5:30
चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या (सीएमआयए) अध्यक्षपदी गुरप्रीतसिंग बग्गा यांची, तर सचिवपदी दुष्यंत पाटील यांची मंगळवारी निवड करण्यात आली.

सीएमआयएच्या अध्यक्षपदी गुरप्रीतसिंग बग्गा
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २८ - चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या (सीएमआयए) अध्यक्षपदी गुरप्रीतसिंग बग्गा यांची, तर सचिवपदी दुष्यंत पाटील यांची मंगळवारी निवड करण्यात आली.
मराठवाड्यातील उद्योगांची शिखर संस्था असणाऱ्या सीएमआयएच्या नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली. नवीन कार्यकारिणी येत्या १ जुलैपासून कारभार सांभाळणार आहे. उपाध्यत्रपदी प्रसाद कोकिळ, कोषाध्यक्षपदी मैथिली तांबोळकर, सहसचिवपदी नितीन गुप्ता, सहकोषाध्यक्षपदी उत्सव माछर यांची नियुक्ती करण्यात आली.