लग्नातील अनिष्ट प्रथा विरोधात गुर्जरांचे १९ ठराव
By Admin | Updated: November 10, 2014 03:51 IST2014-11-10T03:51:28+5:302014-11-10T03:51:28+5:30
समाजातील अनिष्ट चालीरिती बंद करणारे विविध १९ नियमांचे पालन करण्याचा ठराव गुर्जर समाजाच्या वार्षिक अधिवेशनात रविवारी करण्यात आला.

लग्नातील अनिष्ट प्रथा विरोधात गुर्जरांचे १९ ठराव
प्रकाशा (नंदुरबार) : समाजातील अनिष्ट चालीरिती बंद करणारे विविध १९ नियमांचे पालन करण्याचा ठराव गुर्जर समाजाच्या वार्षिक अधिवेशनात रविवारी करण्यात आला.
गुर्जर समाजातर्फे दरवर्षी सामाजिक बैठक घेऊन समाजातील अनिष्ट चालीरिती बंद करण्याचे नियम केले जातात आणि सर्व समाज त्या नियमांचे पालन करतो.
बैठकीतून समाज परिवर्तनाची अनोखी चळवळ सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या या बैठकीला महत्त्व असते. यंदा ही बैठक समाजाचे अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पी.के. अण्णा पाटील यांनी चार दशकांपूर्वी ही परंपरा सुरू केली होती. त्यांच्या निधनानंतर त्याची सूत्रे दीपक पाटील यांच्या हाती देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)