गुरू पौर्णिमेनिमित्त ‘श्रीं’च्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी!
By Admin | Updated: July 20, 2016 00:34 IST2016-07-20T00:34:48+5:302016-07-20T00:34:48+5:30
मलकापूर येथील पालखी शेगावात पोहोचली.

गुरू पौर्णिमेनिमित्त ‘श्रीं’च्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी!
शेगाव (जि. बुलडाणा) : गुरू पौर्णिमेनिमित्त मंगळवारी शेगावात ह्यश्रींह्णच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. गुरू पौर्णिमेनिमित्त गुरूंचे आशीर्वाद घेतल्या जातात. यामध्ये अनेक भाविक श्री संत गजानन महाराजांना गुरू माउली मानत असल्याने पहाटे ५ वाजल्यापासून मंदिर परिसरात गर्दी झाली होती. गर्दी वाढल्याने दोन ते तीन तास रांगेत उभे राहून भाविकांना दर्शन घ्यावे लागले. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे मलकापूर येथील श्रींची पालखी मंगळवारी शेगावात पोहोचली. सुमारे तीन हजार भाविकांचा समावेश असलेल्या या पालखीचे सोमवारी मलकापूर येथून प्रस्थान झाले होते. या पालखीमुळे शहरातील वातावरण गजबजले होते.