गोळी झाडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

By Admin | Updated: June 30, 2016 01:45 IST2016-06-30T01:45:37+5:302016-06-30T01:45:37+5:30

नवीन गाळ्यांच्या बांधकामास अडथळा येणाऱ्या हॉटेलमध्ये कोणतेही बदल करायचे नाही

Gunfight and attempt to murder youth | गोळी झाडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

गोळी झाडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न


पुणे : नवीन गाळ्यांच्या बांधकामास अडथळा येणाऱ्या हॉटेलमध्ये कोणतेही बदल करायचे नाही, या कारणावरून मंगळवारी (दि. २८) नसरापूर येथील गजानन कदम या तरुणाने लहू शेलार (रा. हातवे, सध्या रा. माळेगाव) याच्या कपाळावर पिस्तूल लावून गोळी झाडली. शेलारने हात ढकलल्याने गोळी पत्र्याला लागल्यामुळे त्याचा जीव वाचला.
या घटनेनंतर घटनास्थळाला ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
नसरापूर गावातील एसटी स्थानकानजीक गजानन कदम याने ८ नवीन गाळ््यांचे बांधकाम सुरू केले आहे. या नवीन बांधकाम केलेल्या गाळ्यांकडे जाण्याकरिता नवीन रस्ता गजाननला पाहिजे होता.
एसटीस्थानकाला लागून असलेल्या बनेश्वर विश्रांतीगृह या हॉटेलला शटर बसवायचे आहे, असे हॉटेलमालक गोरख धारबा खुटवड यांनी ठरवले होते. त्यानुसार खुटवड यांनी त्यांचे जावई नितीन शेलार यांना शटरचे काम करून घेण्यास सांगितल्यावरून जावई नितीन मोजमाप घेत असताना गजानन व त्याच्या ३ साथीदारांनी नितीनला हटकले होते. त्यामुळे नितीन शेलार याने काम थांबवले होते. सायंकाळी पावणेसहाच्या वेळेस नितीन शेलार याने त्याचा चुलतभाऊ लहू शेलार याला चहा पिण्यासाठी तेथे बोलावले. त्या वेळी हॉटेलमध्ये गोरख खुटवड चहा बनवित असताना गजानन त्याच्या साथीदारांसह तेथे येऊन तुला सांगितलेले कळत नाही का, असे म्हणून खुटवड यांना दमदाटी केली. त्या वेळी तेथे असलेल्या लहू शेलार याने भांडणे सोडवायला गेला असता लहू शेलार यालाच मारहाण करीत तू आमच्यामध्ये यायचे नाही, असे सांगत लहू शेलार याच्या कपाळावर जीवे मारण्यासाठी पिस्तूल लावली. तुला खलास करतो, असे म्हणून गोळी झाडत असताना लहूने गजाननचा हात ढकलला, त्यामुळे पिस्तूलमधील गोळी लहुच्या डोक्यावरून जाऊन पाठीमागील पत्र्यास लागली, अशी फिर्याद लहू शेलार यांनी राजगड पोलिसांना दिली आहे.
(वार्ताहर)
गजानन जिवराज कदम याला अटक करण्यात आली आहे, तर त्याचे ३ साथीदार राहुल चंद्रकांत पवार, आकाश गेनबा सूर्यवंशी व शुभम उत्तम निकम (सर्व जण रा. नसरापूर) यांनी घटनास्थळावरून पलायन केले आहे. घटनास्थळावर पिस्तुलात वापरलेल्या गोळीची पुंगळी पोलिसांनी ताब्यात घेतली असून गजाननवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gunfight and attempt to murder youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.