शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविल्याने वाद पेटला; जळगावमधील पाळधीत मोठा राडा, संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:21 IST

Gulabrao Patil Clash News: पाळधी गावात कर्फ्यू लागू करण्यात आला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या रात्री जळगावात मोठा राडा झाला आहे. शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या जिल्ह्यात त्यांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविल्याच्या व कारला कट मारल्याच्या रागातून वाद झाला आहे. यातून जमावाने वाहने आणि दुकाने जाळल्याचा प्रकार घडला आहे. 

पाळधी गावात कर्फ्यू लागू करण्यात आला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मंत्री गुलाबराव पाटलांच्या कुटुंबाला घेऊन त्यांचा ड्रायव्हर जात होता. यावेळी त्याने हॉर्न वाजविला आणि कारला कट मारल्याच्या रागातून वाद सुरु झाला. यामुळे पाळधी गावातील काही तरुण जमा झाले. याची खबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लागताच ते देखील तिथे दाखल झाले. यातून गोंधळ सुरु झाला व दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. या घटनेत १२-१५ दुकाने जाळण्यात आली आहेत. 

पाळधी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. २०-२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे कविता नेरकर, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी म्हटले आहे. अंतर्गत वादातून दोन गटात वाद झाला असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv Senaशिवसेना