गुलाबराव गणाचार्य स्मृती दिन पुरस्कार वितरण समारंभ

By Admin | Updated: November 19, 2016 02:40 IST2016-11-19T02:40:50+5:302016-11-19T02:40:50+5:30

गुलाबराव गणाचार्य स्मृती आणि धर्मादाय न्यासतर्फे २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील भुपेश गुप्ता भवन येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले

Gulabrao Ganacharya Smriti Divas award ceremony | गुलाबराव गणाचार्य स्मृती दिन पुरस्कार वितरण समारंभ

गुलाबराव गणाचार्य स्मृती दिन पुरस्कार वितरण समारंभ


मुंबई : कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांच्या ४३ व्या स्मृतिदिनानिमित्त कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य स्मृती आणि धर्मादाय न्यासतर्फे २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील भुपेश गुप्ता भवन येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून, यावेळी चित्रपट दिग्दर्शक परेश मोकाशी आणि जेष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचा गौरव करण्यात येणार आहे.
सुलेखनकार अच्युत पालव यांनी साकारलेल्या बोधचिन्हाचेही
यावेळी अनावरण करण्यात येणार आहे, असे न्यासचे कार्यकारी विश्वस्त व अध्यक्ष अनिल गणाचार्य आणि
बेस्ट समितीचे सदस्य सुनील
गणाचार्य यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: Gulabrao Ganacharya Smriti Divas award ceremony