शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

गुज्जू मतदारांच्या नाराजीचा विचारेंना झाला फायदा

By admin | Updated: May 17, 2014 23:55 IST

राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांना पराभवाची चव चाखावी लागली. मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत नवी मुंबईमध्येच राष्ट्रवादीची प्रचंड पिछेहाट झाली आहे.

नाराजय जाधव/अजित मांडके
- ठाणो
नवी मुंबई, ठाणो आणि मीरा-भाईंदरमध्ये काँग्रेसवाल्यांनी पुकारलेला असहकार आणि शिवसेनेच्या गोटात गेलेले नाईक फॅमिलीतील सदस्य वैभव नाईक, त्यात मोदी लाटेमुळे राष्ट्रवादीची हक्काची नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमधील गुजराती, मारवाडय़ांची मते महायुतीच्या पारडय़ात पडल्याने  राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांना पराभवाची चव चाखावी लागली. मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत नवी मुंबईमध्येच राष्ट्रवादीची प्रचंड पिछेहाट झाली आहे. या भागात राष्ट्रवादीला सुमारे 45 हजार मतांनी मागे जावे लागले आहे. 2क्क्9 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजीव नाईक 49 हजार मतांनी निवडून आले होते. पैकी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून 2क् हजार आणि ऐरोली मतदारसंघातून 13 हजार आणि मिरा-भाईंदरमधून 16 हजार मतांची त्यांना आघाडी मिळाली होती. त्या वेळी नवी मुंबईतील मतदानाची टक्केवारी अवघी 42 टक्के होती. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान झाले. त्यामुळे यंदा 51 टक्क्यांवर मतदान गेले. गेल्या निवडणुकीतील मतदारांपेक्षा यंदा नवी मुंबईतून एक लाख 1क् हजार मतदार वाढले.  
राष्ट्रवादीने मोदी लाटेकडे दुर्लक्ष करीत फोडाफोडीच्या राजकारणाकडे अधिक लक्ष दिले. पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यातही गणोश नाईक यांना अपयश आले. नाईक यांच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात सुमारे 25 हजार आणि संदीप नाईक यांच्या ऐरोली मतदारसंघात सुमारे 2क् हजार मतांचा फटका बसला. विचारे यांना नवी मुंबईतून प्रत्येक बूथवर किमान शंभर ते तीनशे मतांची आघाडी मिळाली आहे. 
गुजराती, मारवाड्यांची 26 हजार मते, जैन समाजाची 2क् हजार मते, वैभव नाईक गटाची सुमारे 15 हजार मते, शिवसेनेची ठाण्याची हक्काची असलेली सुमारे दीड लाख मते, कॉंग्रेसने पुकारलेला असहकार आणि स्वकीयांची होणारी मुस्कटदाबी, मनसेचे बिघडलेले इंजिन आणि मोदी लाटेमुळे आणि नवमतदारांनी शिवसेना-भाजपला कौल दिल्यामुळे नाईक यांचा  पराभव झाल्याचे दिसत आह़े
नवी मुंबईत वंडर्स पार्क, भाईंदर-ठाणोतील स्टेडियम, जेएनएनयूआरएमची अनेक विकास कामे, ठाणो रेल्वे स्थानकांतील विकास कामे, नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचा विकास, बीएसयुपीची घरे अशी नाना विविध विकास कामे केली तरी ठाण्यातील मतदारांनी संजीव यांना नाकारल़े
ठाणो मतदार संघ - ठाणो हा शिवसेना उमेदवार राजन विचारे यांचा हक्काचा मतदारसंघ़ या मतदार सीकेपी मतदारांनी गेल्या खेपेला मनसेच्या राजन राजेंच्या पारडय़ात ब:यापैकी मतदान केले होत़े त्याचीच पुनरूरावृत्ती याखेपेला होईल, ही राष्ट्रवादीची अपेक्षा मतदारांनी धुळीस मिळविली़ विधानसभा निवडणूकीत कसाबसा विजय मिळविणा:या विचारेंना या निवडणुकीत 66 हजार 72 इतके प्रचंड मते मिळविली़ याठिकाणी राष्ट्रवादीच्या देवराम भोईर गटानेही शिवसेनेच्या पारडय़ात मते टाकली आह़ेत़ शिवाय या मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादीनेही फारसे चांगले काम केलेले नाही़ मनसेने आयात उमेदवार अभिजित पानसेंना उमेदवारी दिल्याचा शिवसेनेला या ठिकाणी फायदा झाला
कोपरी-पाचपाखाडी - कोपरी पाचपाखाडी हा शिवसेनेचे ठाणो जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असून या मतदार दलित, कष्टक:यांचा हा मतदार संघ आह़े या मतदार संघावर शिवसेनेचे पूर्णत: वर्चस्व आह़े त्यात वागळे इस्टेट हा परिसर या मतदार संघात येतो़ याठिकाणी मोठय़ाप्रमाणात झोपडपटटी आणि अतिक्रमणो आहेत़ मात्र, ठाण्यातील सध्या चर्चेत असलेल्या क्लस्टरचा सर्वात जास्त लाभ या मतदार संघाला होणार आह़े क्लस्टरसाठी आमदार शिंदेंनी दिलेला लढा सर्वश्रुत आह़े त्याचा मोठा फायदा  विचारेंना या निवडणुकीत झाला़ त्यामानाने स्वत:ला राष्ट्रवादीतील ठाण्याचे भरत म्हणवणा:यांनीही मतपेटीत भगव्याची भरत भेट घेतली. शिवाय कोकणात काँग्रेसशी पंगा घेतल्याने येथील अनेक कॉंग्रेसजनांनीही राष्ट्रवादीच्या संजीव नाईकांसाठी आपले ‘फाटक’ बंद ठेवण्याचेच पसंत केले.
ओवळा-माजीवडा - या मतदारसंघात घोडबंदरसारख्या नवीन ठाणो म्हणून ओळखल्या जाणा:या परिसराचा समावेश होतो़ बहुभाषिक मतदारांचा परिसर हा विभाग ओळखला जातो़ भाईंदर्पयत हा परिसर जोडला गेला आह़े याठिकाणी शिवसेनेचे आक्रमक आमदार प्रताप सरनाईक हे प्रतिनिधीत्व करतात़ गेल्या काही वर्षात त्यांनी या परिसरातील अनेक प्रश्न सोडविले आहेत़ मग ते घोडबंदरमधील उड्डाणपूल असो वा इतर प्रश्ऩ मोनो-मेट्रोसाठी त्यानी केलेला पाठपुरावा सर्व ठाणोकरांना परिचित आह़े ही रेल्वे भाईंदरच्या दारार्पयत न्यावी़, असा त्यांचा प्रय} आहे. उत्तन पर्यटन प्रकल्पाबाबत त्यांनी स्थानिकांना दिलेली साथ पाहता विचारेंच्या प्रचारात व विजयात त्याचा मोठा फायदा झाला़
भाईंदर - संजीव नाईक यांना गेल्या खेपेला नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदार संघानी ज्याप्रमाणो साथ दिली तशीच साथ भाईंदरने दिली होती़ गुजराती मतदार या मतदारसंघात 7क् हजाराच्या घरात आहेत़ त्यांनी याखेपेला नमोचा गजर करून शिवसेनेच्या पारडय़ात आपली मते टाकली़ नाईक यांनी सर्वात जास्त कामे भाईंदर मध्ये केली़ परंतु, त्याचा त्यांना काहीच लाभ झालेला दिसला नाही़ कारण येथील आमदार गिल्बर्ट मेंडो सा आणि काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांची नाराजी त्यांना चांगलीच महागात पडली़ सूत्रंच्या म्हणण्यानुसार या दोन्ही नेत्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या अनुयायांना खुश करण्याचे प्रताप संजीव नाईक यांना चांगलेच महागात पडल़े ते इतके की हुसेन यांनी तर मुख्यमंत्र्यासमोरच काँग्रेस त्यांना मदत करणार नसल्याचे जाहीर करून टाकल़े
ऐरोली - ऐरोली हा संजीव नाईक यांचे बंधू आमदार संदीप यांचा मतदार संघ़ या मतदार संघात माथाडी कामगाराची मते मोठय़ा संख्येने आहेत़ माथाडींच्या शरद पवार यांच्यावरील नाराजीचा फटका संजीव यांना बसला़ शिवाय राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनी मनापासून काम केले नाही़ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुलेंच्या ऐरोली विभागात, संजीव यांचे चुलत बंधू वैभव नाईक यांनी दाम दाम दंड भेद या सूत्रनुसार केलेले बंड त्यांना चांगलेच महागात पडल़े काँग्रेसचे येथील नेते रमाकांत म्हात्रेंसह राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी उघड उघड केलेल्या बंडाचाही त्यांना फटका बसला़ शिवाय गणोश नाईकांसह वैभव यांचीही नाराजी नको म्हणून त्यांच्या हक्काच्या अनेक मतदारांनी मतदानच केले नाही़
बेलापूर - पालक मंत्री गणोश नाईक यांचा हा मतदारसंघ़ तसे पाहिल्यास या मतदार संघावर नाईकांचे वर्चस्व नव्हतेच़ गेल्या खेपेला नामदेव भगत आणि मनसेच्या पप्पू महालेंनी घेतलेली मते वगळली तर नाईकांचा भाजपाच्या सुरेश हावरेंकडून पराभव झाला असता़ शिवाय स्थानिक आगरी-कोळी बांधवांनी त्यांना साथ दिली होती़ या वेळी मात्र याउलट परिस्थिती होती़
आमदार म्हणून स्वत: नाईक यांचे या मतदारसंघात उल्लेखनीय असे कोणतेही काम नाही़ जी काही कामे आहेत ती महापालिका आणि खासदार निधीतील़  परंतु, त्यांचा सामान्यांना म्हणावा तसा फायदा झालेला नाही़
याखेपेला क्लस्टरवरून स्थानिकांत नाईक कुटुंबाविषयी प्रचंड नाराजी पसरली आह़े महापालिकेतील पाच टक्कयांचे प्रकरणापेक्षा त्यांच्या पीएबाबतच्या नाराजीमुळे अनेक नगरसेवक, अधिका:यांत अ‘संतोष’ पसरला असून त्यांची नाराजीही संजीव नाईकांना परदेशी करण्यास भाग पडली आह़े काँग्रेसच्या दशरथ भगत, संतोष शेट्टी या नगरसेवकांची नाराजी़ही त्यांना महागात  पडली आहे.