गुजरातचा गुंगीमॅन अखेर गजाआड

By Admin | Updated: November 1, 2015 01:13 IST2015-11-01T01:13:34+5:302015-11-01T01:13:34+5:30

गुजरात पोलिसांना गुंगीचे औषध देऊन पळ काढणाऱ्या गुंगीमॅनला तब्बल नऊ महिन्यानंतर अटक करण्यास माटुंगा पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे, पोलिसांसह नागरिकांना गुंगीचे औषध देऊन

Gujarat's Gungiman is finally gone | गुजरातचा गुंगीमॅन अखेर गजाआड

गुजरातचा गुंगीमॅन अखेर गजाआड

- मनीषा म्हात्रे,  मुंबई
गुजरात पोलिसांना गुंगीचे औषध देऊन पळ काढणाऱ्या गुंगीमॅनला तब्बल नऊ महिन्यानंतर अटक करण्यास माटुंगा पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे, पोलिसांसह नागरिकांना गुंगीचे औषध देऊन तो लुटत असे. त्यात गुंगीच्या औषधाचे प्रमाण अधिक झाल्याने दोन ज्येष्ठ नागरिकांचा बळी गेला होता.
मूळचा गुजरात येथील रहिवाशी असलेला गुंगीमॅन धनाढ्य व्यावसायिकांना गाठायचा. त्यांना बोलण्यात गुंतवून शीतपेयातून गुंगीचे औषध देत त्यांची लूट करून तो पसार होत असे. बस, टे्रनमधील सहप्रवाशांनाही अशाच प्रकारे बेशुद्ध करून त्यांची फसवणूक करत होता. गुजरातसह महाराष्ट्रातील विविध भागात या गुंगीमॅनने धुमाकूळ घातला होता. याच गुंगीच्या औषधाचे प्रमाण अधिक झाल्यामुळे दोन ज्येष्ठांचा मृत्यू झाला. त्याच्यावर फसवणुकीबरोबर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या हातावर तुरी देत गुंगीमॅन पसार होत असल्याने गुजरात पोलिसांसाठी तो डोकेदुखी ठरला होता. अखेर तो हाती लागला, या आनंदात असलेले गुजरात पोलीस त्याला न्यायालयात नेत असताना गुंनीमॅनने पोलिसांनाच गुंंगीचे औषध देऊन पळ काढण्याचे ठरविले. न्यायालयात नेत असताना पत्नीच्या मदतीने त्याने शीतपेयामधून पोलिसांना गुंगीचे औषध देऊन न्यायालयातून पळ काढला. गुजरात पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके त्याच्या शोधासाठी गुजरातसह महाराष्ट्रातत रवाना झाली होती. तब्बल नऊ महिने पोलिसांना गुंगारा देत गुंगीमॅन पळ काढत होता. हा गुंगीमॅन माटुंगा येथे येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक देवाडीकर यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एम. काकड यांच्या मार्गदर्शनाखाली देवाडीकर यांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

गुंगीसाठी झोपेच्या गोळ्यांचा वापर
औषधांच्या दुकानात सहज उपलब्ध होणाऱ्या वेगवेगळ्या गुंगीच्या औषधांसह झोपेच्या गोळयांचा वापर गुंगीसाठी वापर करत होता. याच गुंगीच्या औषधाद्वारे तो नागरिकांची फसवणूक करत होता. यात आणखी किती जणांचा सहभाग आहे? तो असे का करत होता? याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Gujarat's Gungiman is finally gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.