गुजरातचा डोळा 16 हजार कोटींवर?
By Admin | Updated: November 29, 2014 01:50 IST2014-11-29T01:50:34+5:302014-11-29T01:50:34+5:30
मुंबईतील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय गुजरातमध्ये हलविण्याच्या भाजपाच्या खासदाराच्या मागणीवरून आता गदारोळ सुरू झाला आहे.

गुजरातचा डोळा 16 हजार कोटींवर?
पश्चिम रेल्वेचे मुख्यालय : भाजपा खासदाराची मागणी
मुंबई : मुंबईतील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय गुजरातमध्ये हलविण्याच्या भाजपाच्या खासदाराच्या मागणीवरून आता गदारोळ सुरू झाला आहे. सध्या पश्चिम रेल्वेला उपनगरीय लोकल सेवा, मालवाहतूक व लांब पल्ल्याच्या वाहतूकसेवेतून वर्षाला 16 हजार कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. यामध्येही मालवाहतूक व लांब पल्ल्याची सर्वाधिक वाहतूक गुजरातमधूनच होत असल्याने थेट हाच दावा न करता वेगळे कारण पुढे करीत असल्याची चर्चा रंगली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे उपनगरीय लोकल सेवेतून कमी उत्पन्न मिळत असून, मालवाहतूक आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांतून सर्वाधिक उत्पन्न पश्चिम रेल्वेला मिळते. पश्चिम रेल्वेमार्गावर गुजरात ते मुंबई अशा प्रवासासाठी एकूण 100 ट्रेन धावतात. तर गर्दीच्या काळातही मागणी पाहता गुजरातसाठी विशेष ट्रेन सोडून पश्चिम रेल्वेकडून उत्पन्न मिळविले जाते. यातून उत्पन्न मिळवत असतानाच त्यापेक्षाही मालवाहतुकीतून उलाढाल करीत पश्चिम रेल्वे सर्वाधिक उत्पन्न मिळवत असते. गुजरातमध्ये मुंद्रा, कांडलासह अन्य बंदरे मोठय़ा प्रमाणात असून, येथून पश्चिम रेल्वेमार्गावर जास्त मालवाहतूक होते. मालवाहतुकीत गुजरातचा सर्वात जास्त वाटा असून, अन्य विभागाकडून कमी उत्पन्न मिळत असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले. गुजरातमधून होणा:या मालवाहतुकीतून मिळणारे उत्पन्न पाहता पश्चिम रेल्वेने अहमदाबादसाठी अनेक सोयीसुविधांनी सुसज्ज अशी खास पार्सल ट्रेनही काही महिन्यांपूर्वी सुरू केली आहे. कोलकाता, गुजरातमध्ये सध्या ब:याच उद्योगधंद्यांना चालना मिळत असून, येथील व्यापार मोठय़ा प्रमाणात वाढतच आहे. हे पाहता उत्पन्न वाढीसाठी गुजरात, कोलकातासाठी खास पार्सल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहमदाबाद ते हावडा आणि वापी ते न्यू गुवाहाटी अशी पहिली पार्सल एक्स्प्रेस ट्रेन पश्चिम रेल्वेकडून सुरू करण्यात आली. 468 टन सामान वाहून नेणारी ही ट्रेन 60 तासांत आपली सेवा चोख बजावत आहे. ही आर्थिक उलाढाल पाहताच पश्चिम रेल्वेचे मुख्यालय अहमदाबादला हलविण्याचा विचार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे खासदार गप्प का ?
च्पश्चिम रेल्वेचे कार्यालय अहमदाबाद येथे हलविण्याच्या भाजपाच्या खासदाराने केलेल्या मागणीस प्रवासी संघटनांनी विरोध केला. मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी विरोध करीत यासंदर्भात महाराष्ट्र आणि खासकरून मुंबईतील खासदार गप्प का, असा सवाल केला़
च्केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने या संधीचा गैरफायदा घेऊन मुंबईतले उद्योगधंदे आणि रेल्वे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो आम्ही हाणून पाडू. त्याचप्रमाणो रेल्वे अधिकारी आंदोलन समितीचे अध्यक्ष शैलेंद्र कांबळे यांनीही भाजपाच्या या मागणीचा विरोध करीत 150 वर्षाचा इतिहास असलेल्या ‘परे’ला पूर्णपणो बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
च्कर्मचारी व प्रवासी अधिक असतानाही असा विचार करणो चुकीचे असून, मुंबईचे वैभवच उद्ध्वस्त करण्याचा हा डाव
आम्ही हाणून पाडू, असे सांगितले.
वाह्यात मागण्या करू नका
देशात आपले सरकार आले म्हणून वाह्यात मागण्या करू नका. पश्चिम रेल्वे व मुंबईला असा एक इतिहास आहे, परंपरा आहे ते ओळखल पाहिजे. शिवसेना केवळ भावनिकदृष्टय़ा हा विषय पाहात नाही. मुंबईत मुख्यालय असल्याने अशी काय अडचण होते, ते आधी स्पष्ट करा. मुंबईत टर्मिनस आहे, त्यामुळे इथे मुख्यालय असणो नैसर्गिक व स्वाभाविक बाब आहे. त्यामुळे भलत्यासलत्या मागण्या करू नका.- खा. अरविंद सावंत, शिवसेना प्रवक्ता