मनसेची सत्ता जाताच नाशिकमध्ये गुजराती भाषेला 'अच्छे दिन'
By Admin | Updated: March 7, 2017 12:43 IST2017-03-07T12:34:06+5:302017-03-07T12:43:46+5:30
मुंबईसह अन्य महापालिका आणि जिल्हापरिषदांमध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजपाला कौल दिला आहे.

मनसेची सत्ता जाताच नाशिकमध्ये गुजराती भाषेला 'अच्छे दिन'
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 7 - नाशिक महापालिकेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता जाताच गुजराती भाषेला 'अच्छे दिन' दिसू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत नाशिकच्या जनतेने मनसेला हद्दपार करुन भाजपाला बहुमताचा कौल दिला. हे सत्तापरिवर्तन होताच नाशिकमध्ये गुजराती भाषेमधले फलक झळकले आहेत.
रामकुंड, पंचवटी तसेच रस्त्यांवर गुजराती भाषेतले फलक लागले आहेत. नाशिकमधला हा बदल शहरात चर्चेचा विषय ठरला असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईसह अन्य महापालिका आणि जिल्हापरिषदांमध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजपाला कौल दिला आहे.
मुंबईतला गुजराती मतदार भाजपाच्या पाठिशी ठामपणे उभा राहिल्याने मुंबईतील भाजपाच्या जागा मोठया प्रमाणात वाढल्या. मुंबईतही काही भागात वीजेची बीले गुजराती भाषेंमध्ये देण्यात आल्यानंतर मनसेने आक्षेप घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. गुजराती भाषेचा अशा सार्वजनिक ठिकाणी वाढता वापर भविष्यातील भाषिक संघर्षाचे कारण ठरु शकतो.