गुजरातचे उद्योग राज्यात आले

By Admin | Updated: March 1, 2017 06:02 IST2017-03-01T06:02:13+5:302017-03-01T06:02:13+5:30

महाराष्ट्र हे उद्योगांसाठी देशातील क्रमांक एकचे राज्य असल्याचा पुनरुच्चार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला

The Gujarat industry came to the state | गुजरातचे उद्योग राज्यात आले

गुजरातचे उद्योग राज्यात आले


मुंबई : महाराष्ट्र हे उद्योगांसाठी देशातील क्रमांक एकचे राज्य असल्याचा पुनरुच्चार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. ‘लोकमत’ एक्सलन्स अ‍ॅवॉडर््स सोहळ्यात ते बोलत होते. हा दिमाखदार सोहळा नुकताच वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडला. विविध क्षेत्रांतील दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना उद्योग गुजरातमध्ये जातात असे वाटते का, असा प्रश्न विचारल्यावर देसाई यांनी हे स्पष्टपणे नाकारले. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून उद्योग गुजरातमध्ये जात होते, मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
ते पुढे म्हणाले, उलट गुजरातमधील उद्योग मोठ्या प्रमाणात आता महाराष्ट्रात येत आहेत. उद्योग-व्यवसाय क्षेत्रात आता बरेच बदल झाले आहेत. परदेशी गुंतवणूकही वाढत आहे. देशात होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के गुंतवणूक आपल्या राज्यात होत आहे. पुढच्या काही वर्षांत चित्र अजून बदलेल, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
>उद्योगांसाठी पोषक वातावरण - मुनगंटीवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताचे एक वेगळे चित्र निर्माण झालेले आहे. उद्योग क्षेत्रासाठी आपल्याकडे पोषक, चांगले वातावरण आहे. देशात नरेंद्र मोदी तर राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करत आहे. उद्योग क्षेत्राला या पोषक परिस्थितीचा फायदा होतो, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ‘लोकमत’ एक्सलन्स अ‍ॅवॉडर््स सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी मुनगंटीवार यांनी भविष्यात राज्यातील उद्योग क्षेत्र अधिक प्रगत होईल, असा विश्वास व्यक्त केला. जागतिक क्रमवारीत १९५ देशांमध्ये भारत नवव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर आला, ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. सन्मानित केलेल्या उद्योजकांचे अभिनंदन करत, ते म्हणाले, तुम्ही अधिकाधिक काम करा, तुमच्या व्यवसायाची वृद्धी झाली म्हणजे देशाचीही वृद्धी होईल, असे म्हणत त्यांनी सर्व पुरस्कारप्राप्त व्यावसायिक, उद्योजकांचे अभिनंदन केले.
>आम्ही कोणालाही जेव्हा देशात गुंतवणूक का करता, असे विचारतो तेव्हा सरकार चांगले आहे, असे उत्तर मिळते. अन्य देशांमध्ये लोकसंख्या स्थिर होत चालली आहे. तुलनेत आपल्याकडे लोकसंख्या वाढत आहे. पुनर्जन्माची संकल्पनाही आपल्याकडेच आहे. त्यामुळे पुनर्जन्म व्हायचा झाल्यास तो भारतात होईल, म्हणून आपल्याकडे गुंतवणुकीसाठी ओढा वाढत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगताच, उपस्थितांत खसखस पिकली.
>‘लोकमत’ एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड्स
‘लोकमत’द्वारे आयोजित या दिमाखदार एक्सलन्स अ‍ॅवॉडर््स सोहळ्यात व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील ५९ दिग्गजांचा गौरव करण्यात आला.
‘लोकमत’ला शाबासकी
उद्योग, व्यवसाय क्षेत्रात यशस्वी उद्योजकांनी दिलेल्या योगदानाला ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे. यामुळे ‘लोकमत’ समूहाला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या वेळी शाबासकी दिली.

Web Title: The Gujarat industry came to the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.