पूर्व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मार्गदर्शिका

By Admin | Updated: July 20, 2016 05:07 IST2016-07-20T05:07:10+5:302016-07-20T05:07:10+5:30

उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व माध्यमिक इयत्ता आठवीच्या पूर्व शिष्यवृत्ती परीक्षांचा अभ्यासक्रम जाहीर झाला आहे.

A guide to pre-scholarship exams | पूर्व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मार्गदर्शिका

पूर्व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मार्गदर्शिका


मुंबई : उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व माध्यमिक इयत्ता आठवीच्या पूर्व शिष्यवृत्ती परीक्षांचा अभ्यासक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत तयार करण्यात आलेल्या मराठी माध्यमातील चार मार्गदर्शिका पुस्तकांचे मंगळवारी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे, शिक्षण आयुक्त राजेंद्र गोधणे, सहायक आयुक्त श्रीमती स्मिता गौड , शिष्यवृत्ती समिती सदस्य जयदास म्हाप्रळकर, आदी उपस्थित होते.
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व माध्यमिक पूर्व शिष्यवृत्ती परीक्षेच्या मराठी व गणित विषयाचा पेपर १ व २ तसेच इंग्रजी व बुध्दिमत्ता चाचणी विषयाचा पेपर १ व २ चा अभ्यासक्रम तावडे यांच्या हस्ते आॅनलाईन अपलोड करण्यात आला.
>शिष्यवृत्ती परीक्षा सन २०१६-१७ या शैक्षणिक वषार्पासून मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, ऊर्दु, सिंधी, कन्नड व तेलगू या आठ माध्यमांतून घेण्यात येणार असून सद्यस्थितीत या परीक्षेची मार्गदर्शिका पुस्तिका मराठी माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे. ही पुस्तके शिक्षक, विद्यार्थी व पालकांना उपयुक्त ठरणार आहेत. लवकरच इतर माध्यमांतील मार्गदर्शिका पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत.

Web Title: A guide to pre-scholarship exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.