व्यवसाय क्षेत्रात करिअरची संधीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By Admin | Updated: April 30, 2016 02:37 IST2016-04-30T02:37:02+5:302016-04-30T02:37:02+5:30
नेरूळ येथील स्टर्लिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

व्यवसाय क्षेत्रात करिअरची संधीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नवी मुंबई : नेरूळ येथील स्टर्लिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत स्पर्धात्मक युग तसेच
व्यवसाय क्षेत्रातील वाढती मागणी
या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
वित्त, विपणन, मानव संसाधन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या क्षेत्रांमधील बदलत्या पध्दती, कामाच्या नवनवीन पध्दती यावर प्रकाश टाकण्यात आला.
वरिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षक अजय गोयल यांनी व्यवसाय आणि तंत्रज्ञान कल यावर विचारविनिमय आणि चर्चा केली. यामध्ये
संशोधन कागदपत्रांच्या सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
‘बिझनेस २०२० : इश्युज
अॅण्ड चॅलेंजेस’ या आयएसबीएन प्रकाशित शीर्षक आणि दोन आॅनलाइन परस्पर आढाव्याचे ई-जनरल्स एनसीआरडी बिजनेस रिव्ह्यू आणि एनसीआरडी टेक्निकल रिव्ह्यू यांची दुसरी आवृती प्रकाशित करण्यात आली.