गुहागर समुद्रकिनारी मृत व्हेल मासा

By Admin | Updated: October 8, 2016 04:53 IST2016-10-08T04:53:46+5:302016-10-08T04:53:46+5:30

गुहागर समुद्रकिनारी तब्बल ४२ फुटी व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला.

Guhaagar beach with dead whales | गुहागर समुद्रकिनारी मृत व्हेल मासा

गुहागर समुद्रकिनारी मृत व्हेल मासा


गुहागर (जि. रत्नागिरी) : गुहागर समुद्रकिनारी तब्बल ४२ फुटी व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी याबाबत वनविभागाला माहिती देताच तब्बल तीन तासांहून अधिक वेळ प्रयत्नांनंतर त्याला पाण्यातून बाहेर काढून किनारपट्टीवर वाळूमध्ये पुरण्यात आले.
गुहागर वरचा पाट येथे सकाळपासून उग्र वास येऊ लागल्याने काही ग्रामस्थांनी समुद्रकिनारी पाहणी केली. त्यावेळी व्हेल जातीचा मृत महाकाय मासा किनाऱ्यावर असल्याचे दिसून आले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी हजर झाले.
सकाळी दहा वाजता जेसीबी बोलावून या माशाला पुरण्यासाठी वाळूमध्ये मोठा खड्डा खणण्यात आला. यानंतर तब्बल तीन तास या महाकाय माशाला किनाऱ्याबाहेर घेण्याचा प्रयत्न जेसीबीच्या साहाय्याने चालू होता. मात्र, त्याला यश आले नाही. अखेर भरती आल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाबरोबर माशाला बाहेर काढण्यात आले.
>वाळूत खोल खड्ड्यात पुरले :
नर जातीच्या या व्हेलचे वजन १० टन असून, लांबी ४२ फूट आहे. परिक्षेत्र वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी किनारपट्टीवर खोल खड्डा खणून या व्हेलला पुरले.
गुहागर (वरचा पाट) समुद्रकिनारी शुक्रवारी ४२ फुटी व्हेल मासा मृतावस्थेत सापडला.

Web Title: Guhaagar beach with dead whales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.